Walk In Winter हिवाळ्यात (Winter) आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात रोज आर्धा ते एक तास मॉर्निंग वॉक केल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते.त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होत नाही. पण मॉर्निंग वॉक करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात मॉर्निंग वॉक करण्याची योग्य वेळ कोणती तसेच मॉर्निंग वॉक करताना कोणती काळजी घ्यावी? याबाबात जाणून घेऊयात...


मॉर्निंग वॉक करण्याची योग्य वेळ 
हिवाळ्यात सकाळी मॉर्निंग वॉक करायचा असेल तर 7 वाजता करावा. कारण सात वाजता थंडी कमी झालेली असते तसेच सकाळी सूर्याची किरणे शरीरावर पडतात. ज्यामुळे फ्रेश वाटते आणि जास्त थंडी देखील वाजत नाही. हिवाळ्यात वृद्ध व्यक्तींनी सकाळी 11:00 च्या सुमारास वॉक करावा. तसेच रस्त्यावर किंवा जॉगिंग ट्रॅकवर न जाता घरातील टेरेसवर किंवा घरातच वृद्ध व्यक्तींनी वॉक करावा.  


फॉलो करा या टिप्स
मॉर्निंग वॉक करताना थंड पाणी पिणे टाळा. चालताना जर तहान लागत असेल तर एक कोमट पाण्याची बाटलीसोबत ठेवा.कोमट पाणी प्यायल्यानं पचन क्रिया चांगली होते. बीपी, हृदयासंबंधित आजार किंवा सांधेदुखीची समस्या असणाऱ्यांनी हिवाळ्यात मॉर्निंग वॉक करणे टाळावे. मॉर्निंग वॉकला जाताना स्वेटर, मफलर यांचबरोबर कानाला हवा लागणार नाही अशी टोपी देखील घालावी. 


हिवाळ्यात घ्या ही काळजी 


हिवाळ्यात सर्दी किंवा कफ झाला तर सर्वप्रथम वाफ घ्या. वाफ घेतल्याने गरम हवा नाकात आणि तोंडात जाते. त्यामुळे सर्दी किंवा कफ कमी होतो.  वाफ घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये निलगिरी तेलाचे दोन थेंब टाका. दिवसातून दोन वेळा या पाण्याची  घेतल्यानंतर तुमची सर्दी कमी होईल. हिवाळ्यात पचन क्रिया मंदावते  त्यामुळे हिवाळ्यात व्यायाम करणं देखील महत्वाचं आहे.  हिवाळ्यात शरीराला सतत हायड्रेट ठेवा. जास्त पाणी प्यायल्यानं वात, पित्त होणे किंवा कफ होणे या समस्या जाणवत नाहीत. तसेच सकाळी तुम्ही एक ग्लास गरम पाणी पिऊ शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


Health Tips : दिवसभरात इतकी मिनिटे उन्हात बसणे शरीरासाठी आवश्यक; व्हिटॅमिन डी बरोबरच मिळतात आश्चर्यकारक फायदे