Amebiasis Infection : पावसाळ्याचा (Rainy Season) ऋतू हा जसा मनाला आल्हाददायक सुख देतो तसाच अनेक आजारांनाही आमंत्रण देतो. पावसाळ्यात अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग पसरतात. या ऋतूत रोगांचा प्रादुर्भाव खूप होतो. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेतली नाही तर अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारांची लागण होऊ शकते. जसे की, ताप, सर्दी, खोकला यांसारखे सामान्य आजार तर पसरतातच. पण त्याचबरोबर पसरणारा आणखी एक रोग म्हणजे अमेबियासिस (Amebiasis). हा रोग नेमका काय आहे? त्याची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय कोणते आहेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.


अमेबियासिस म्हणजे काय?


अमेबियासिस हा एंटामोईबा हिस्टोलिटिका नावाच्या प्रोटोझोआमुळे आतड्यांवरील परजीवी संसर्ग आहे. या आजाराला 'अमीबिक डिसेंट्री' असेही म्हणतात. हा रोग होतो तेव्हा पोटदुखी, दुखणे आणि मल सैल होणे यांसारखी काही लक्षणं उद्भवतात. परजीवी जीवाणूंमुळे होणारा अमेबियासिस हा प्रामुख्याने पाण्यापासून होणारा आजार आहे. हा रोग संक्रमित पाणी पिणे आणि दूषित अन्नपदार्थ खाल्ल्याने होतो. ज्या ठिकाणी योग्य स्वच्छता नसते अशा ठिकाणी या रोगाचं प्रमाण जास्त असते. हा परजीवी मोठ्या आतड्यात शिरकाव करतो. त्यानंतर शरीराच्या अनेक प्रणालींवर परिणाम करतो. अमेबियासिसने पीडित व्यक्तीच्या पोटात हा रोग झाल्यानंतर 1 ते 4 आठवड्यांनंतर याची लक्षणे दिसतात. असे असले तरी मात्र, केवळ 10 ते 20 टक्के लोक अमेबियासिसमुळे आजारी पडतात.


अमेबियासिस रोगाची लक्षणे कोणती?



  • ओटीपोटात प्रचंड वेदना आणि जळजळ होणे

  • अतिसाराचे वाढते प्रमाण

  • स्टूलसह तीव्र रक्तस्त्राव

  • उजव्या ओटीपोटात तीव्र वेदना जाणवणे

  • उच्च ताप येणे

  • उलट्या होणे

  • चक्कर येणे

  • भूक न लागणे


'या' गोष्टी लक्षात ठेवा



  • टॉयलेट सीट नियमितपणे स्वच्छ करा.

  • पावसाळ्यात सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरणे टाळा.

  • नेहमी हात धुतल्यानंतरच अन्नपदार्थांचं सेवन करा.

  • बाळाचे डायपर बदलल्यानंतर कोमट पाण्याने हात धुवा.

  • बाहेरून आलेली फळे आणि भाज्या चांगल्या प्रकारे धुवा.

  • बाहेरचे तिखट, तेलकट अन्नपदार्थ  खाणे टाळा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर