Subodh Bhave: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. सुबोध हा सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट शेअर करतो. सुबोध हा त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती देखील सोशल मीडियावरुन चाहत्यांना देत असतो. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सुबोधनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.


सुबोध भावेची पोस्ट


सुबोधनं  गुरुपौर्णिमेनिमित्त  खास पोस्ट शेअर केली.. त्यानं सिंदखेडराजा येथील काही फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं,  आज गुरूपौर्णिमा, राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानी म्हणजे सिंदखेडराजा येथे त्यांचा जन्म झाला त्या वास्तूला भेट देण्याचा योग आला. स्वातंत्र्याचा पहिला हुंकार जिथे उमटला त्या पवित्र वास्तूच आणि आई जिजाऊं यांचे आशीर्वाद घेता आले. आई जिजाऊ आणि कळत-नकळत संस्कार करणार्‍या सर्व गुरूंना मनापासून वंदन आणि साष्टांग नमस्कार' 


सुबोधनं शेअर केलेल्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'खूप छान योग, गुरुपौर्णिमेनिमित आपणास व समस्त गुरुजनांस साष्टांग वंदन व शुभेच्छा' 






सुबोध भावेची पोस्ट


काही महिन्यांपूर्वी सुबोधचा फुलराणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याच्या वाळवी या चित्रपटाचं देखील अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटात सुबोधसोबतच  स्वप्निल जोशी, अनिता दाते आणि शिवानी सुर्वे या कालाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. सुबोधच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. सुबोधचा चाहता वर्ग मोठा आहे.


आणि डॉ. काशिनाथ घाणेकर,  लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमधील सुबोधच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच तुला पाहते रे या मालिकेमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला.






 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


 Subodh Bhave : कधी लाल्याच्या भूमिकेत 'एकदम कडक' एन्ट्री तर कधी 'बालगंधर्व'; सुबोधचा विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांना घालतो भुरळ