एक्स्प्लोर

Coffee News : कॉफी पिणाऱ्यांनो..! जरा इथे लक्ष द्या, कारण हीच बातम्या तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची

Health : कॉफी प्यायल्यानंतर, कॅफिन केवळ 15 मिनिटांत तुम्हाला ऊर्जा देण्यास सुरुवात तर करते. परंतु कॉफी शरीरात गेल्यानंतर त्याचं काय होतं? दररोज किती कप कॉफी तुमच्या आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या

Health News : आजच्या धावपळीच्या युगात चहा (Tea) आणि कॉफी (Coffee) घेतल्या शिवाय अनेकांना काम करणे कठीण असते, कारण चहा किंवा कॉफी पिल्याने त्यांचा आळस निघून जातो असं म्हणतात.  कॉफीचे सेवन हा आजच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. यामध्ये असलेले कॅफिन तुम्हाला त्वरित ऊर्जा तर देते. पण अनेक लोक थकवा आणि आळस दूर निघून जावा यासाठी याचे भरपूर प्रमाणात सेवन करू लागले आहेत. कॉफी मर्यादित प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असले तरी, जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. रोज एक कपपेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने शरीराला कसे हानी पोहोचते? हे जाणून घ्या


दररोज किती कप कॉफी प्यावी?

तुम्ही दररोज किती कप कॉफी घेता? एक, दोन की त्यापेक्षा जास्त? तुम्हाला माहित आहे का तज्ज्ञ काय सांगतात ते? तज्ञांच्या मते, प्रौढांनी दररोज 400 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिन घेऊ नये. सरासरी एक कप कॉफीमध्ये सुमारे 95 मिलीग्राम कॅफिन असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही दिवसातून 4 कप कॉफी प्यायली तर ते पुरेसे आहे. यापेक्षा जास्त कॉफी घेणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. त्याच वेळी, 4-6 वर्षांच्या मुलांसाठी हे प्रमाण 45 मिलीग्राम आहे, 7-12 वर्षांच्या मुलांसाठी हे प्रमाण 70 मिलीग्राम आहे. मुलं पौगंडावस्थेत पोचतात, तेव्हा ते अभ्यासासाठी जागृत राहण्यासाठी कॉफीचे सेवन करतात. तेव्हा त्यांनी फक्त दोन कप कॉफी म्हणजेच 100 ते 200 मिलीग्रॅम कॅफिन घेतले पाहिजे.

कॉफी 10 तासांनंतरही शरीरातच राहते

तुम्हाला माहित आहे का? कॉफी प्यायल्यानंतर, कॅफिन केवळ 15 मिनिटांत तुम्हाला ऊर्जा देण्यास सुरुवात करते. शरीराच्या आत पोहोचण्यापेक्षा शरीरातून बाहेर पडण्यासाठी जास्त वेळ लागतो. शरीरातील अर्धे कॅफिन काढून टाकण्यासाठी सुमारे तीन ते पाच तास लागतात. त्याच वेळी, 75 टक्के कॅफिन काढून टाकण्यासाठी सुमारे सहा तास लागतात. 10 तासांनंतर शरीरातून कॅफिन पूर्णपणे काढून टाकले जात नाही, ज्यामुळे तुम्ही अनेक रोगांना सहज बळी पडू शकता.

रक्तदाबाची तक्रार

जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर जास्त प्रमाणात कॅफीन पिणे तुमच्या शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकते. कॉफीमध्ये असलेले कॅफिन तुम्हाला त्वरित ऊर्जा देते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर यामुळे तुमच्या रक्तदाबाची संख्या लगेचच वेगाने वाढेल. मर्यादेत कॉफीचे सेवन करणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर तुम्ही उच्च बीपीमुळे हृदयाच्या असामान्य ठोक्यांना बळी पडू शकता. अशात तुमच्या शरीराचे तापमान वाढते आणि रक्तवाहिन्यांनाही वेगाने काम करावे लागते. यामुळे हृदयावर दबाव येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

पोटाचे विकार

कॉफीचे सेवन केल्याने तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते, पण त्यामुळे पोटाशी संबंधित विकारही होतात. जास्त कॉफी प्यायल्यास पोटातून गॅस्ट्रिक हार्मोन्स जास्त बाहेर पडतात. त्यामुळे गॅस, ॲसिडीटी, जुलाब यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

निद्रानाशाची समस्या

जर तुम्हाला झोपायला त्रास होत असेल तर तुम्ही जास्त कॉफी पिऊ नये. कॉफीमध्ये असलेले कॅफिन झोप कमी करते. जर तुम्हाला आधीच निद्रानाशाचा त्रास होत असेल तर ही परिस्थिती आणखी बिघडू शकते.

हाडांसाठी हानिकारक

कॉफीचे जास्त सेवन करणे देखील हाडांसाठी फायदेशीर मानले जात नाही. जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने हाडांचे आजार ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढू शकतो.

कॉफी कधी प्यावी? कधी पिऊ नये?

जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल तर सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्या उर्जेत घट जाणवते. अशा परिस्थितीत तुम्ही कॉफी प्यायल्यास तुम्हाला झटपट ऊर्जा मिळेल आणि तुमचे शरीर सक्रिय होईल. याशिवाय तुम्ही दुपारनंतर म्हणजे 4 वाजेच्या सुमारास कॉफीचे सेवन करू शकता. मात्र रात्री उशिरा कॉफी पिणे टाळा. असे न केल्यास तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय मोठ्या आकाराच्या कपमध्ये कॉफी कधीही घेऊ नका. मोठे कप जास्त कॉफी देईल. याशिवाय कॅफिनचे प्रमाणही वाढेल. अशा परिस्थितीत, सरासरी आकाराच्या कपमध्येच कॉफी प्या.

 

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

 

महत्त्वाच्या बातम्या :

Pumpkin Side Effects : 'या' लोकांनी भोपळ्यापासून लांब राहिलेलंच बरं; नाहीतर उद्भवू शकतात आरोग्याच्या समस्या!

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget