Kissing Benefits: ‘व्हॅलेंटाईन वीक’ 7 फेब्रुवारीपासून सुरू होतो. या आठवड्यात 13 फेब्रुवारीला ‘किस डे’ (Kiss Day 2022) साजरा केला जातो. ‘किस डे’ हा व्हॅलेंटाइन वीकचा सर्वात रोमँटिक दिवस मानला जातो. या दिवशी लोक त्यांच्या जोडीदाराचे किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे चुंबन घेतात त्यांचे प्रेम देखील व्यक्त करतात. असे मानले जाते की, या दिवशी किस केल्याने प्रेम वाढते. पण तुम्हाला माहित आहे का की, चुंबन घेणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे?


चुंबनाचे काही आरोग्यविषयक फायदे आहेत. त्यामुळे एखाद्याच्या मनावरील तणाव दूर होतो. चुंबन करताना आपल्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे हार्मोन्स तयार होतं. त्यामुळे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते.


तणाव-चिंतेपासून मुक्ती 


चुंबन घेताना शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते, तेव्हा व्यक्तीला तणावमुक्तही वाटते. चुंबनासोबतच, मिठी मारणे किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणणे, यासारखे भावनिक संवाद देखील आपल्या मनोवैज्ञानिक प्रक्रियेसाठी चांगले मानले जाते.


नियंत्रित रक्तदाब 


एका प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका आंद्रिया डिमिर्झिओन म्हणतात, 'चुंबन आपल्या हृदयाचे ठोके वाढवून रक्तवाहिन्या विस्तृत करते. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे, रक्त प्रवाह वाढतो आणि रक्तदाब लगेच कमी होतो.’


डोकेदुखीपासून आराम


रक्तवाहिन्या विस्तारून आणि रक्त प्रवाह वाढल्याने शारीरिक त्रासही दूर होतो. रक्तवाहिन्यांच्या विस्तारामुळे रक्तदाब कमी झाल्यास डोकेदुखीसारख्या समस्याही दूर होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


कोलेस्टेरॉल इम्प्रूव्हमेंट  


एका रिपोर्टनुसार, रोमँटिक किसिंगचा अनुभव शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीशी देखील संबंधित आहे. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित राखता येते. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोकाही कमी होऊ शकतो.


कॅलरी बर्न  


चुंबन घेताना आपल्या शरीरातील कॅलरीज जलद बर्न होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका मिनिटाच्या चुंबनाने 2 ते 26 कॅलरीज कमी होऊ शकतात. अर्थात, वजन कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम फॉर्म्युला मानला जाऊ नये, परंतु हे खरे आहे की, यामुळे अतिरिक्त कॅलरीज कमी होतात.


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha