Valentine's Day 2022: फेब्रुवारी महिन्यातील ‘व्हॅलेंटाईन वीक’ प्रेमी जोडप्यांसाठी अधिक खास असतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस आणखी खास वाटावा म्हणून खूप तयारीही केली जाते. या आठवड्यात दररोज काहीतरी विशेष असते. 7 फेब्रुवारीला ‘रोज डे’ने सुरू होणारा प्रेमाचा आठवडा 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ने संपतो. या आठवड्यात आज म्हणजे 12 फेब्रुवारीला ‘हग डे’ (Hug Day) अर्थात ‘मिठी दिवस’ साजरा केला जातो.


या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त केल्यानंतर एखाद्याला मिठी मारणे नेहमीच आरामदायी असतं. इतकंच नाही तर, या जादू की झप्पीचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. यामागे शास्त्रज्ञांनी काही कारणेही दिली आहेत. चला जाणून घेऊया ‘मिठी’चे फायदे...


अभ्यास म्हणतो...


जवळच्या व्यक्तीला 20 सेकंद मिठी मारल्याने तुमच्या मनाला मोठ्या प्रमाणात शांती मिळते. ‘वॉर्म हग’ नावाच्या एका अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे. या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, तुमच्या जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारल्याने तणावाची पातळी कमी होते. या अभ्यासात 200 लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांना खूप तणावपूर्ण टास्क देण्यात आले होते.


यात अर्ध्या लोकांना त्यांच्या जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारण्यास सांगण्यात आले आणि अर्ध्या लोकांना तसे न करण्यास सांगितले गेले. ज्यांनी मिठी जोडीदाराला मारली त्यांनी सांगितले की, असे केल्याने त्यांचा ताण बऱ्याच अंशी कमी झाला आहे.


मिठी मारण्याचे फायदे :


* तणाव पातळी कमी होते


* शारीरिक दुखण्यापासून आराम मिळतो


* रक्तदाब कमी होतो


* आत्मविश्वास वाढतो


* भीती दूर होते


* मानसिक संतुलन चांगले राहते


यावरून हे सिद्ध होते की, जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने तुम्हाला खूप मानसिक आराम मिळू शकतो. म्हणूनच, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला दिवसातून एकदा तरी मिठी मारली पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला शरीराला देखील आराम मिळेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha