Valentine's Day: 'होंठों से छू लो तुम' असं म्हणणाऱ्या प्रेमी युगुलांच्या आयुष्यात 'किस'चे महत्व हे वेगळंच आहे. 'किस' ही गोष्ट अशी आहे की त्यामुळे प्रेम करणारी दोन मनं ही भावनिकदृष्ट्या अधिक जवळ येतात. म्हणूनच व्हॅलेंटाईन वीकमध्ये तर त्याला मोठं महत्व आहे. व्हॅलेंटाईन डे च्या आधीचा एक दिवस म्हणजे किस डे.


किस डे हा कपल्स डे म्हणून 13 फेब्रुवारीला साजरा केला जातोय. या दिवसाने कपल्समधील प्रेम भावनात्मकरित्या अजून भक्कम होण्यास मदत होतेय. किस डे हा व्हॅलेंटाईन वीकमधील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातोय. कारण आपल्या भावना रोमॅन्टिक आणि अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस तो काय असू शकतो. ते आपल्या मनातील भावना कोणत्याही शब्दाविना व्यक्त करतात.


चुंबन हे फक्त आपल्या प्रेयसीचे अथवा प्रियकराचेच घेतले जाते असे नाही. त्यामागच्या भावनाही वेगवेगळ्या आहेत. चुंबन हे नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे त्याच्या आईकडून घेतले जाते, वृद्ध माता-पित्यांचे आपल्या मुलांकडून घेतले जाते किंवा आपल्या बहिण-भावाचे घेतले जाते. अशा अनेक भावना चुंबनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येतात. त्यामुळे या दिवसाचे महत्व काही वेगळेच आहे.


रोमॅन्टिक पद्धतीने प्रेम व्यक्त
प्रेमीयुगुलांसाठी या दिवसाचे महत्व खूपच आहे. चुंबन हे प्रेम, पॅशन, आदर, मैत्री अशा विविध भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे, तेही रोमॅन्टिक पद्धतीनं. त्यामुळे दोन मनं भावनिकदृष्ट्या अधिक जवळ येतात, त्यांच्यातील प्रेम अधिक खुलतं.


ऑक्सिटॉक्सिन हार्मोन्स तयार
महत्वाचं म्हणजे चुंबनाचे काही आरोग्यविषयक फायदे आहेत. त्यामुळे एखाद्याच्या मनावरील तणाव दूर होतो. चुंबन करताना आपल्या शरीरात ऑक्सिटॉक्सिन नावाचे हार्मोन्स तयार होतंय. त्यामुळे मनावरील ताण कमी होण्यास मदक होते.


तर मग आजच्या दिवशी किस डे साजरा करताना हे लक्षात ठेवा की त्या 'किस' प्रमाणे तुमचे आयुष्यही एकमेकांशी जोडलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या प्रेमाच्या भावना एकमेकांशी ओठाच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी चालून आलीय... ही संधी दवडू नका.


संबंधित बातम्या: