Important days in 19th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 19 एप्रिलचे दिनविशेष.
1882 : चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ यांचे निधन.
हक्सचार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती आणि विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रीय पद्धतीने उलगडून दाखवले. सन 1882 साली इंग्रजी निसर्गविज्ञानी, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ तसेच, उत्क्रांती विज्ञानाचे जनक चार्ल्स डार्विन यांचे निधन झाले.
1892 : शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म.
ताराबाई मोडक यांचा जन्म इंदूर येथे 19 एप्रिल 1892 रोजी झाला. त्या एक मराठीभाषक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’म्हणतात. ताराबाईंना इ.स. 1962 साली ‘पद्मभूषण’हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल करण्यात आला.
1910 : क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन.
अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.
1957 : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.
मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला आहे. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक, फॉच्र्युन ग्लोबल 500 कंपन्या आणि त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी $97.4 अब्ज संपत्तीसह 11व्या स्थानावर आहेत.
1975 : आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला.
आर्यभट्ट् हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह आहे. प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे. हया उपग्रहाचे प्रक्षेपण रशिया मधिल कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून 19 एप्रिल 1975 साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहकाद्वारे करण्यात आले.
19 एप्रिल : अंगारक संकष्ट चतुर्थी
अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात शुभ मानली जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रत कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरे केले जातो. संकष्ट चतुर्थी जी मंगळवारी येते त्याला 'अंगारक योग संकष्ट चतुर्थी' असे म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी गणपतीला समर्पित आहे.
जागतिक यकृत दिन
यकृतसंबंधी आजारांची माहिती होण्यासाठी 19 एप्रिल हा जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानवी शरीरात यकृत (लिव्हर) महत्त्वपूर्ण अवयव आहे.
महत्वाच्या बातम्या :