RR Vs KKR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 30 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरनं कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. या सामन्यात जोस बटलरनं शतक झुंजार शतक ठोकलं आहे. आयपीएल 2022 मधील त्याचं दुसरे शतक आहे. या शतकासह त्यानं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. राजस्थानसाठी तीन शतक मारणारा जोस बटलर पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही.


कोलकाताविरुद्ध जोस बटलरनं 59 चेंडूत आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील दुसरं शतक ठोकलं आहे. ज्यात 9 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइकरेट 172.88 होता. मात्र, तो 61 चेंडूत 103 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. या सामन्यात जोस बटलरसमोर उमेश यादव, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, सुनील नरायण आणि आंद्रे रसेल सारख्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. 


जोस बटलरचं विक्रमी शतक
जोस बटलर आयपीएलमध्ये तीन किंवा त्याहून अधिक शतक ठोकणारा सहावा खेळाडू ठरला आहे. याआधी ख्रिस गेल, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन आणि संजू सॅमसन यांनी तीन किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत. गेल- 6, विराट कोहली- 5, डेव्हिड वॉर्नर- 4, वॉटसन- 4 आणि संजू सॅमसननं 3 शतके केली आहेत. 


राजस्थानचं कोलकात्यासमोर 218 धावांचं लक्ष्य
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्ससमोर  धावांचं 218 लक्ष्य ठेवलं होतं. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 217 धावा केल्या आहेत.


हे देखील वाचा-