Pisces Weekly Horoscope : मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खास असणार आहे. मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात काही आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. परंतु, काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
मीन राशीच्या लोकांनी स्वतःच्या तोंडाने स्वतःची प्रशंसा करणे टाळावे. कारण असे केल्याने लोक तुमची चेष्टा करू शकतात. स्वार्थी लोक सुद्धा तुमचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करू शकतात. समोर स्तुती करणाऱ्यांचेही भान ठेवण्याची गरज आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अशी योजना आखली असेल तर तूमच्या या योजनेला यश मीळू शकते.
मार्केटिंग आणि बँकेशी संबंधित लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. लोखंडाचा व्यवसाय करताना नफ्याबाबत सतर्क राहा. यासोबतच कर्ज देणे आणि घेणे टाळा. रखडलेले पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते. जोडीदाराकडून करिअरमध्ये प्रगती होऊ शकते.
जोडीदाराच्या सल्ल्याने महत्त्वाच्या कामात फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या संपर्कात राहावे. तुमच्या प्रतिकारशक्तीवर विशेष लक्ष दिले पाहिजे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही आजारी पडू शकता. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या आणि अनावश्यक वाद टाळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या