Important days in 12th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 12 एप्रिलचे दिनविशेष. 


1910 : सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) यांचा जन्म. 


पुरुषोत्तम भास्कर भावे हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. पु.भा. भावे यांनी कादंबऱ्या, नाटक, लेखसंग्रह आणि प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. अकुलिना, अडीच अक्षरे, दर्शन, दोन भिंती इ. त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. 


1943 : ज्येष्ठ भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांचा जन्म.


सुमित्रा महाजन ह्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या आहेत. त्या 2014 ते 2019 या काळात लोकसभेच्या सभापती होत्या. त्यांना 2021 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. इ.स. 2020 चा पद्मभूषण पुरस्कार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.


1961 : रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर


युरी अलेक्सेइविच गागारिन हे सोवियेत संघाचे अंतराळयात्री होते. एप्रिल 12, इ.स. 1961 रोजी गागारिन अंतराळात जाणारे सर्वप्रथम व्यक्ती ठरले. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने 89 तास 34 मिनिटे त्यांनी भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्यांना अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.


1978 : भारतीय रेल्वेला 125 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पहिली डबल डेकर ट्रेन धावली. 


भारतातीव पहिली डबल रेल्वे मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनलवरून पुण्याला रवाना झाली होती. 


1992 : SEBI ची स्थापना


सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची स्थापना सर्वप्रथम 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी वैधानिक संस्था म्हणून केली गेली. 12 एप्रिल 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा 1992 संमत केल्याने वैधानिक अधिकार देण्यात आले. सिक्युरिटीज एक्सचेंजच्या कायद्यांद्वारे मंजूर करणे. आर्थिक मध्यस्थांच्या खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करणे. कार्यकारी प्रमुख म्हणून गैरव्यवहारांची तपासणी करून त्यावर कारवाई करणे इ. सेबीची मुख्य कार्य आहेत.    


1997 : भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.


हरदनहळ्ळी देवेगौडा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी आणि भारताचे माजी पंतप्रधान होते. जून 1996 ते एप्रिल 1997 ह्या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये पंतप्रधानपदावर राहिलेले देवेगौडा दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते. 1996च्या सार्वत्रिक निवडणुकीत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेशा जागा जिंकल्या नव्हत्या. तेव्हा युनायटेड फ्रंटने काँग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि देवेगौडा सरकारचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि भारताचे अकरावे पंतप्रधान झाले. 1 जून 1996 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि 11 एप्रिल 1997 पर्यंत राहिले.


1998 : सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.


चिदंबरम सुब्रमण्यम हे भारतीय राजकारणी आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते होते. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. अन्न आणि कृषी मंत्री म्हणून त्यांनी भारतीय हरित क्रांतीची सुरुवात केली. हरित क्रांती घडवून आणण्याच्या त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना 1998 मध्ये भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.


2013 : भारतातील प्रसिद्ध गीतकार गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


गुलजार हे भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आहेत. गुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. आजवर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 2013 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha