Healthy Shravan Fast Recipes : महाराष्ट्रात सणांना फार महत्त्व आहे. आणि श्रावण (Shravan 2022) भाद्रपद महिना आला की विविध सण आणि व्रतवैकल्यांना सुरुवात होते. अनेक पूजापाठ सुरु होतात. श्रावणात अनेकांचे उपवास असतात. मात्र, सवय मोडल्यामुळे किंवा तब्येतीमुळे अनेकांना हे उपवास करणं जमत नाही. या श्रावणात तुम्हाला सुद्धा उपवास करायचा असेल पण त्याचबरोबर तुमचे आरोग्यदेखील जपायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपवासाचे काही खास सोपे पदार्थ सांगणार आहोत. या पदार्थांचा वापर करून तुम्ही उपवास केलात तर तुम्हाला अशक्तपणाही जाणवणार नाही आणि तुमचे आरोग्यही सुधारेल. त्याचबरोबर तुमचे व्रतही पूर्ण होईल. तर हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊयात.  

  


उपवास म्हणजे शरीराच्या पाचनसंस्थेला 1 दिवस आराम देणे. हा खरा त्यामागचा उद्देश असतो. यंदाच्या श्रावणात तुम्हीसुद्धा उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स... 


श्रावणात उपवासाला नेमके कोणते पदार्थ खावेत?


1. लाह्या (Lahya) : उपवासाला लाह्या हा सर्वात चांगला पदार्थ आहे. लाह्या या पचायला सुद्धा हलक्या असतात. आणि यामुळे अशक्तपणा देखील जाणवत नाही.     


2. मूगाचे कढण : मूग हे पचायला हलके आणि पौष्टिक असे कडधान्य आहे. याचे सुंठ आणि जीरे घालून सूप तयार केल्यास पचनशक्ती चांगली राहील. 


3. दह्याचे सेवन करा : दही केवळ चवीला छानच नाही तर पोट डिटॉक्स करण्यासाठी देखील चांगले आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. श्रावणातील उपवासादरम्यान दही (Curd Benefits) खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 


4. भरपूर फळं खा : खरंतर फळ आणि उत्तम आरोग्य यांचं समीकरणच आहे. उपवासाच्या वेळी तुमच्या शरीरात जीवनसत्त्वं पुरविण्याचं काम फळं करतात. तसेच फळांमुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे उपवासाच्या वेळी फळांचा ज्यूस न पिता तुम्ही फळं कच्ची किंवा कापून खा.  


श्रावणात आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही जर विचार केला तर उपवासाच्या वेळी या पदार्थांचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :