OBC Reservation : भुजबळ (Chhagan Bhujbal) हे ओबीसींसाठी काम करत होते. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन सदस्य झारीतल्या शुक्राचार्य याची ओबीसी आरक्षणाची (OBC Reservation) इच्छा नव्हती. ओबीसी आरक्षणासाठी खोडा घालणारे हे दोन्ही नेते असल्याची खळबळजनक टीका भाजपचे नेते चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bavankule) यांनी केली आहे.
भाजप नेते तथा माजी मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज ओबीसी मेळाव्याचे (OBC Melava) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बावनकुळे यांनी यावेळी ओबीसी आरक्षणाचा प्रवासच मांडला. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी लढा दिला मात्र खऱ्या अर्थाने भाजपने ओबीसी आरक्षण पूर्णत्वास नेले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विशेष प्रयत्नामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडीचे नेते आम्हीच ओबीसी नेते असल्याचं सांगत आहेत. मात्र ओबीसींसाठी सत्तेत असताना काही केले नाही. 2016 मध्ये भाजप सरकार होते, तेव्हा काँग्रेसने ओबीसी आरक्षणात आडकाठी आणत न्यालायात याचिका दाखल केली. त्यावेळी ओबीसीना 27 टक्के आरक्षण कसे योग्य आहे हे कोर्टाला पटवून सांगावे ही फडणवीस यांची इच्छा होती. 2018 ला पुन्हा काँग्रेस न्यालायात गेले. तेव्हा आम्ही पुन्हा 27 टक्के आरक्षण योग्य कसे हे पटवून सांगितले. त्यानंतर राज्यातील सर्व निवडणूक सुरू झाल्या. ओबीसी आरक्षण मिळाले.
त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. महाविकास आघाडी काही गडबड करतील असे वाटत होते, तेव्हा भुजबळ, आणि इतर नेत्यांना भेटलो. ओबीसी आरक्षण अध्यादेश लाप्स होईल हे सांगितले. मात्र ऐकले नाही, तुमच सरकार गेले तुम्ही जा असे सांगीतले. त्यानंतर कोर्टाने ट्रिपल टेस्ट मागितली. त्यानंतर भुजबळ, वडेट्टीवार हे नेते मोर्चे आंदोलन करत राहिले. न्यायालयाने 4 मार्चला ओबीसी आरक्षण रद्द केले. 5 मार्च ला फडणवीस यांनी पुन्हा भूमिका मांडली.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारने 435 कोटी रुपये ओबीसी जनगणना साठी देण्याचा प्रस्ताव फेटाळला. यावेळी भाजपासह सर्व संघटनानी मोर्चे काढले. त्यानंतर बांठिया आयोग आला. आडनाव वरून ओबीसी जनगणना याला आम्ही विरोध केला. कालांतराने बांठिया आयोगाचा अहवाल आला, मागील सरकारने केवळ टाईमपास केला.त्यांना महापालिकासह सर्व निवडणूक ओबीसी शिवाय घ्यायच्या होत्या, असा गंभीर आरोपही यावेळी बावनकुळेंनी केला.
भुजबळ साहेब आता तुम्ही शांत बसा
भुजबळ हे ओबीसींसाठी काम करत होते, मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन सदस्य झारीतल्या शुक्राचार्य याची ओबीसी आरक्षणाची इच्छा नव्हती. भुजबळ, वडेट्टीवार यांनी अडीच वर्षात जे केले नाही, ते शिंदे फडणवीस यांनी केले. शिंदे फडणवीस यांनी सॉलिसिटर जनरलची भेट घेतली. गरीब ओबीसींच्या जागी धनदांडग्या ओबीसींना त्यांच्या जागी बसवायचे होते. या दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ काम करत होते. मात्र नेत्यांचा मनात पाप होते. 99 टक्के महाविकास आघाडीचे यश आहे, असे भुजबळ सांगत होते. मात्र 4 महिने चुकीचे काम होत होते तेव्हा झोपले होते का? शिंदे फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण मिळाले असून मी खोटं बोलत असेल तर कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. त्यामुळे भुजबळ साहेब आता तुम्हाला शांत बसण्याची वेळ आली असल्याचे इशारा यावेळी बावनकुळे यांनी भुजबळांचे कौतुक करत दिला आहे.
उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे झारीतले शुक्राचार्य
भुजबळ हे ओबीसींसाठी काम करत होते. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन सदस्य झारीतल्या शुक्राचार्य याची ओबीसी आरक्षणाची इच्छा नव्हती.
दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी खोडा घालणारे मागील सरकारमधील दोन्ही नेते आहेत. ठाकरे सरकारने केवळ टाईमपास केला. त्यांना महापालिकासह सर्व निवडणूक ओबीसी शिवाय घ्यायच्या होत्या. शिवाय यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये यासाठी निर्गुंडे आयोगाला 435 कोटी रुपये दिले नसल्याचा आरोप यावेळी बावन कुळे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
यावेळी चंद्रकांत बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांना 100 वर्ष आयुष्य लाभो. त्यांची मुलखात एका प्रेस मीडिया समोर द्यावी. एकाच खोलीत कॅमेरा समोर बोलावे लागते. संजय राऊत यांचे प्रश्न, फिक्स मुलाखत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अजून हसू करून घेऊ नये, संजय राऊत यांच्या ट्रॅप मधून बाहेर पडावे. तसेच उद्धव ठाकरे यांनी मंथन करावे, असा सल्ला यावेळी बावनकुळे यांनी दिला आहे.
लोकसभा मतदारसंघात दौरा
केंद्रातील भाजपने 144 लोकसभा मतदारसंघात प्रवास करण्याचा निर्णय घेतला असून 18 महिन्यात 6 वेळा केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत. तर ऑगस्ट महिन्यात केंद्रीय मंत्री मुक्कामी राहतील. तसेच महाराष्ट्र राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री भेट देणार असून महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे. आम्हाला 20/20 मॅच खेळायची असून भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन मंत्रीपद देणार आहोत. हा अधिकार शिंदे फडणवीस यांचा आहे. त्याच्या नियोजनसाठी आजपासून दौरा सुरू केला असल्याचे बावनकुळंनी सांगितले.