Important Days in August : अवघ्या सात दिवसांवर ऑगस्ट महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ऑगस्ट महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे दिवस साजरे केले जातात. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? चला जाणून घेऊयात. 


1 ऑगस्ट : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी. 


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली.


2 ऑगस्ट : नागपंचमी.


सोमवार व्यतिरिक्त अगदी दुसऱ्याच दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजेच नागपंचमी (Nag Panchami 2022). यंदा नागपंचमीचा सण 2 ऑगस्ट 2022 रोजी आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते.


2 ऑगस्ट : मंगळागौरी पूजन. 


श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. 


4 ऑगस्ट : गोस्वामी तुलसीदास जयंती.


गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते. तुलसीदासांचा जन्म इसवी सन 1497 या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर यथे झाला. वाल्मिकी रामायणानंतर गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेले रामचरितमानस अधिक प्रमाण मानले जाते. श्रावण शुद्ध सप्तमीला तुलसीदासांचा जन्म झाला. तुलसीदासांना युगप्रवर्तक हिंदी महाकवी, असे संबोधले जाते.


6 ऑगस्ट : हिरोशिमा दिन (Hiroshima Day).


हिरोशिमा  ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रांताची राजधानी आणि चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे. 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानमधील हिरोशिमा इथे पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला. अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हिरोशिमामध्ये 13 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विध्वंस झाल्याचं सांगितलं जातं. एका क्षणात हजारो लोक मृत्यूमुखी पडले.


9 ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिन. 


संयुक्त राष्ट्रसंघाने या आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे हक्क, अधिकाराचे रक्षण व्हावे यासाठी 1993 साल हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.


9 ऑगस्ट : मोहरम. 


मोहरम किंवा मुह्हरम हा एक मुस्लिम सण आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ "निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा" असा आहे. इस्लामी कालगणनेचा पहिला मास. मुहर्रमचा शब्दशः अर्थ ‘पवित्र’ असा आहे. 'पवित्र कुराणा'त संकेतित केल्याप्रमाणे चार पवित्र मासांपैकी (मुहर्रम, शव्वाल, जिल्काद व जिल्हज्ज) मुहर्रम हा एक पवित्र मास होय. मुहर्रम पहिल्या तारखेपासून सुरू होऊन दहा दिवसापर्यंत चालतो. मुहर्रमच्या दहाव्या दिवसाला आशूरा म्हणतात.


11 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा. 


श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे. समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते.


11 ऑगस्ट : रक्षाबंधन.


श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ मूळ उत्तरी भारतातला हा सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो.


12 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day)


आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. राष्ट्रांनी 1985 मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले.


13 August – International Lefthanders Day


15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन (Independence Day)


स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट इ.स. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.


19 August – World Photography Day, World Humanitarian Day


20 August – World Mosquito Day


26 August – Women’s Equality Day


29 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day)


29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. शिवाय खेळातील सर्वोच्च जीवन गौरव पुरस्कार म्हणून 2002 पासून ध्यानचंद पुरस्कार देण्यात येतो. आपल्या कारकिर्दीत खेळात असामान्य कर्तृत्व दाखविणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही त्या खेळासाठी जीवन वेचणाऱ्या क्रीडापटूला ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.


30 August – Small Industry Day


First Friday of August – International Beer Day


ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार : जागतिक मैत्री दिन (Friendship Day)


भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन साजरा केला जातो. इ.स. 1958 पासून पेरुग्वेमध्ये सुरू झालेला हा जागतिक मैत्री दिन उपक्रम दक्षिण अमेरिकेतील बहुतांशी देशात आवर्जून साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी परस्परांना मैत्री दिवसाच्या शुभेच्छा देतात, रंगीत धागे बांधतात, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात आणि आपली मैत्री चिरंतन राहो अशा सदिच्छा व्यक्त करतात.


महत्वाच्या बातम्या :