World No-Tobacco Day 2022 : बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच वाढत्या तणावामुळे अनेक जण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. खरंतर प्रत्येक गोष्टीचं व्यसन हे वाईटच. मात्र, अशा वाईट सवयींपासून मुक्तता मिळविण्यासाठी टाटा मेमोरिअल सेंटर (TMC),  मुंबई यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने तंबाखू सोडा लाईन (Tobacco Quit Line) (TQL) केंद्राची स्थापना केली. आणि या माध्यमातून देशातील तंबाखूच्या सर्रास वापराला आळा घालण्यासाठी एक पुढाकार घेतला. तंबाखू सोडण्यास इच्छुक असलेल्या लोकांना प्रभावी समुपदेशन प्रदान करणे आणि त्यांना 1800-11-2356 या टोल फ्री क्रमांकाद्वारे तंबाखू सोडण्यास सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हे विनामूल्य आणि सहज उपलब्ध आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत गेल्या तीन वर्षांत तब्बल 12,000 व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्त करण्यात यश आले आहे. दरवर्षी 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 (World No-Tobacco Dayम्हणून पाळला जातो. 


काय आहे हा उपक्रम? 


या उपक्रमाच्या माध्यमातून तंबाखूच्या पाकिटावर जो टोल फ्री क्रमांक असतो. 1800 -11-2356 यावर तुम्ही तंबाखू सोडायची इच्छा व्यक्त करू शकता. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तिन्ही राज्यातून जर कॉल केला तर तो कॉल टाटा हॉस्पिटलला जोडला जातो. त्यानंतर काऊन्सिलर अशा लोकांचं काऊंसिलिंग करतात. तसेच औषधांचा वापर न करता अशा लोकांना या व्यसनातून मुक्त करतात.


या संदर्भात अधिक माहिती देताना टाटा हॉस्पिटलचे प्रकल्प प्रभारी डॉ. अतुल बुदुख यांनी असे सांगितले की, "तंबाखूची सवय सोडता येते. यासाठी फक्त आपल्या मनावर ताबा असणे गरजेचे आहे." 


यावर उपाय काय? 



  • तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी यावर अनेक उपाय आहेत. जसे की, तुम्ही सकाळी गरम पाण्यात लिंबू मिसळून तुम्ही हे लिंबूपाणी पिऊ शकता.

  • सर्वात महत्वाचे म्हणजे मनावर ताबा ठेवणे. 

  • योग्य समुपदेशनातून व्यसनमुक्त होता येते. 

  • जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करावे.


महत्वाच्या बातम्या :