Benefits Of Black Salt : काळे मीठ आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात वापरले जाते. प्राचीन काळापासून भारतीय आहारात काळे मीठ (Black Salt) वापरले जाते. काळे मीठ केवळ पदार्थाची चव वाढवते असे नाही, तर, या मिठाचे अनेक फायदे देखील आहेत. फळांचा रस, सुका मेवा या शिवाय चाट पदार्थांची चव वाढवण्यासाठी देखील काळे मीठ वापरले जाते. काळे मीठ चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.


आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात काळे मीठ सहज उपलब्ध असते. पण, त्याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहीत नसतात. काळ्या मीठाचा वापर वजन कमी करण्यासाठी, तसेच केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील केला जातो. चला तर, जाणून घेऊया काळ्या मिठाचे फायदे...



  1. वजन कमी करण्यात मदत करते : काळ्या मिठात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात. हे मीठ वाढते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात काळे मीठ मिसळून प्या. त्याचा प्रभाव वाढवण्यासाठी या पाण्यात लिंबू मिसळा. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

  2. त्वचा निरोगी बनवते : काळ्या मीठामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यात मदत करतात. यासाठी कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा लवकर बरी होण्यास मदत होईल. यासोबतच ते त्वचेसाठी नैसर्गिक क्लिन्झरप्रमाणे काम करते. हे मिश्रण त्वचेवरील अस्वच्छता काढून टाकून, त्वचा आतून निरोगी बनवण्यास मदत करते.

  3. केस मजबूत करण्यासाठी फायदेशीर : जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील, तर ते मजबूत करण्यासाठी काळे मीठ वापरू शकता. दुतोंडी केसांची समस्या असल्यास हेअर पॅकमध्ये काळे मीठ मिसळा. काळ्या मिठामुळे केसांना आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळतात. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

  4. अपचनाची समस्या कमी होते : जर अपचनाची समस्या असेल, तर काळ्या मीठाचा आहारात आवर्जून समावेश करावा. यामुळे पोटातील अतिरिक्त ऍसिड कमी होण्यासही मदत होते. काळे मीठ तुमची अॅसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करते. अॅसिडिटीची समस्या असल्यास गरम पाण्यात काळे मीठ मिसळून प्यावे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :