World Food Day 2021: दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने  (Food and Agriculture Organization, FAO)  जागतिक अन्न दिन हा उपक्रम  सुरू केला. 1981 मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा केला गेला होता. त्यानंतर हा दिवस दरवर्षी जगभरात 150 शहरांमध्ये साजरा केला जातो. उपासमारी पिडीतांना मदत करणे तसेच अन्नाचे महत्व सर्वांना सांगणे हे उद्देश जागतिक अन्न दिनाचे आहेत.  'आमची कृती आमचे भविष्य- चांगले उत्पादन, चांगले पोषण, चांगले वातावरण आणि चांगले जीवन'  (Our actions are our future- Better production, better nutrition, a better environment and a better life) अशी यावर्षीच्या जागतिक अन्न दिनाची थीम आहे.  


जागतिक अन्न दिनाचा इतिहास
16 ऑक्टोबर 1945 साली  FAO ची स्थापना झाली. ही संघटना कृषी आणि  खाद्य सुरक्षा या गोष्टींवर काम करते. या संघटनेचे मुख्य कार्य कुपोषणाचे प्रमाण कमी करणे हे आहे. 'अन्न आणि कृषी संघटनेने' जगभरातील उपासमार आणि कुपोषणाने ग्रस्त लोकांबद्दल चिंता व्यक्त  केली. त्यानंतर त्यांनी जागतिक अन्न दिन साजरा करण्याची घोषणा केली. 1981 साली 'अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक अन्न दिनाची स्थापना केली. 


Health Care Tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे; अनेक आजारांवरही गुणकारी


जागतिक अन्न दिनाचे महत्व 
गरीब लोकांना उपासमारी, कुपोषण या समस्यांचा सामना करावा लागतो. संतुलित आहार न घेतल्याने अनेकांचं कुपोषण होते. याबद्दल लोकांमध्ये जागरूक निर्माण करणे आणि ही समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचं काम जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने केले जाते. त्यामुळे जागतिक अन्न दिन हा महत्वाचा आहे.


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम