Health Care Tips: सर्वांना माहित आहे की हळद घातलेले दूध हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर जखम झाली तर अनेकजण हळदीचा वापर औषध म्हणून करतात. सर्दी झाल्यावर देखील हळद घातलेले दूध पितात. काही लोकांना झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर हळद टाकून  दूध पिण्याची सवय असते. हळद उष्ण असते. त्यामुळे हळद दूध प्यायल्याने अनेकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त आहे, अशा लोकांनी हळद टाकलेले दूध पिणे टाळावे. ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त आहे अशा लोकांना हळदीयुक्त दूध प्यायल्यानंतर त्यांच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जाणून घेऊयात. 
 
या लोकांनी हळद दूध पिणे टाळावे. 
एखाद्या व्यक्तीला जर यकृताचा त्रास असेल तर त्यांनी हळद टाकलेले दूध प्यायचे टाळावे. कारण हळद दूध प्यायल्याने यकृता संबंधित त्रास आणखी वाढू शकतो. 


नपुंसकता येऊ शकते
हळदीमध्ये  टेस्टोस्टेरॉची पातळी कमी करते. त्यामुळे स्पर्मची सक्रियता देखील कमी होते. 


Health Care Tips: फळांच्या साली आहेत आरोग्यासाठी उपयुक्त; जाणून घ्या फायदे


ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त आहे 
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण हे वेगवेगळं असते. ज्या लोकांना उष्ण पदार्थ खाल्यावर किंवा प्यायल्यावर त्रास होते, अशांनी हळद दूध पिणे टाळावे. हळद दुधामुळे शरीरातील उष्णता वाढते. उष्णता वाढल्याने स्किनवर फोड येणे किंवा अस्वस्थ वाटणे हे त्रास होऊ शकतात. 


Health Care Tips: चहामध्ये साखरे ऐवजी करा गुळाचा वापर; जाणून घ्या फायदे


गर्भवती महिलांनी देखील हळद टाकलेले दूध पिणे टाळावे
गर्भवती महिलांना अनेकवेळा लोक हळद टाकलेले दूध पिण्याचा सल्ला देतात. पण हळद दूध प्यायल्याने पोटात उष्णतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांनी सुरुवातीचे तीन महिने तरी हळद दूध पिणे टाळावे. ते त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी वाईट ठरू शकते.


टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.