Benefits of Fruit and Vegetable Peels:  अनेकजण फळे खाऊन झाल्यावर त्याच्या साली टाकून देतात तर काही जण फळे सालासकट खातात.  आर्युवेदानुसार फळांच्या साली डिप्रेशनच्या संबंधीत आजारांपासून तुम्हाला वाचवू शकतात. फळांच्या सालींचा वापर आहारात केल्याने तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल. जाणून घ्या फळांच्या सालींमधून मिळणारे फायदे:    


 फळांच्या साली आहेत आरोग्यासाठी फायदेशीर
केळी- केळीच्या सालांमध्ये फिल गुड हार्मोन सेरॉटोनिन आहे, जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच यामध्ये ल्यूटिन नावाचा अॅंटीऑक्सिडेंट देखील आहे. ल्यूटिनमुळे तुम्हाचा मोतीबींदूसारख्या डोळ्यांच्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. यासाठी केळीच्या साल  पाण्यात टाकून दहा मिनीटे उकळवा. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर प्यावे.     


Health Care Tips: चहामध्ये साखरे ऐवजी करा गुळाचा वापर; जाणून घ्या फायदे


 संत्री


संत्री आणि मोसंबीसारख्या अंबट फळांमध्ये सुपर फ्लॅवोनॉइड असते. सुपर फ्लॅवोनॉइड हे शरीराच्या नसांमध्ये जास्त दबाव पडू देत नाही. तुमच्या ह्रदयाचेसाठी संतरीचे साल फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही सुपमध्ये संतरीच्या सालांचा वापर करू शकता.  


नाशपाती
नाशपतीच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि ब्रोमलेन असते. जे पोटासाठी चांगले आहे. पोटासंबधीत सर्व आजारांसाठी नाशपती फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही नाशपती सालीसहित खाऊ शकता किंवा त्याच्या ज्यूस तयार करू शकता.


Fake Red Chilli Powder: असे ओळखा भेसळयुक्त लाल तिखट


भाज्यांच्या साली 
भाज्यांच्या साली भोपळ्याच्या सालींमध्ये व्हिटा कॅरटीन फ्री रेडिक्सल नष्ट करतात. तसेच भोपळ्याच्या साली या कॅन्सरपासून देखील वाचवू शकतात.  तुम्ही भोपळ्यांच्या सालीचा वापर भाजी तयार करताना करू शकता. 


कोरफड एक फायदे अनेक, आपल्या घरात असलेल्या कोरफडीचे फायदेच फायदे, जाणून घ्या



 
टिप: वरील माहितीमध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. यासारख्या कोणत्याही उपचार आणि औषधांचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.