Disadvantages of Drinking Tea: अनेक जणांना सकाळी उठल्यावर लगेच चहा पितात. जर तुम्हाला रिकाम्या पोटी चहा प्यायची सवय असेल तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी वाईट आहे. कारण चहा  अॅसिडीक असतो. रिकाम्या किंवा उपाशी पोटी चहा प्यायल्याने हार्ट बर्नची समस्या होऊ शकते. तसेच तुम्हाला अॅसिडीटी देखील होऊ शकते.  त्यामुळे चहा किंवा कॉफी ही सकाळी रिकाम्या पोटी पिणे टाळावे.  


रिकाम्या पोटी चहा  पिणे आरोग्यासाठी हानिकारक  
चहा किंवा कॉफी अॅसिडीक असल्याने रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरिराचे अॅसिडीक बॅलेन्स बिघडते. त्यामुळे तुम्हाला अॅसिडीटी होऊ शकते. त्यामुळे उपाशी पोटी चहा पिऊ नये. चहा किंवा कॉफी जर तुम्हाला प्यायची असेल तर  जेवणानंतर किंवा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ शकता. चहासोबत तुम्ही बिस्कीट खाऊ शकता. त्यामुळे तुमची भूक देखील कमी होईल.


चहामध्ये साखरे ऐवजी करा गुळाचा वापर


चहामध्ये गुळ टाकल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गुळाच्या चहामुळे तुमच्या शरिरातील साखरेचं प्रमाण कमी होईल. साखर जास्त खाल्याने ब्लॅक हेड आणि व्हाइट हेड वाढू शकतात. त्यामुळे साखरे ऐवजी जर तुम्ही चहामध्ये गुळाचा वापर केला तर या समस्या होणार नाहित. गुळाचा चहा पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि छातीत जळजळ होत नाही. कारण गुळामध्ये आर्टिफिशल स्वीटनचे प्रमाण कमी आहे तसेच गुळामध्ये अनेक व्हिटॅमिन आणि मिनरल आहेत. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. 


वर्क-आऊटच्या आधी कॉफी प्या 
कॉफीमध्ये उष्णतेचे प्रमाण जास्त असते. वर्क आऊट करताना जर तुम्हाला  कॅलोरी बर्न करायचे असतील, तर तुम्हाला कॉफी प्ययल्याने ऊर्जा मिळेल.  त्यामुळे वर्क आऊट करताना किंवा वर्क आऊटच्या नंतर तुम्ही कॉफी पिऊ शकता. 


Health Care Tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे; अनेक आजारांवरही गुणकारी


 
टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम