National Women's Health Week 2022 : खरंतर महिला या एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळतात. म्हणून तर त्यांना 'सुपर वूमन' म्हटलं जातं. परंतु, घरच्यांची काळजी, मुलांचं शिक्षण त्यांचं संगोपन, घराची जबाबदारी या सगळ्यात त्या इतक्या व्यस्त होऊन जातात की त्यांचं तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. आणि कालांतराने त्या आजारी पडतात. सध्या राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह सुरु आहे. याच निमित्ताने महिलांना त्यांच्या दिनश्चर्येबाबत, त्यांच्या सवयींबाबत आणि त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा सप्ताह आहे. तर चला जाणून घेऊयात महिलांनी नेमक्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टींची सवय लावली पाहिजे.    


1. दररोज व्यायाम करा : 


वयोमानानुसार आपल्या हाडांची झीज होते आणि सांधेदुखी. संधीवात यांसारखे हाडांचे दुखणे सुरु होते. अशा वेळी या आजारांना टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. रोज किमान अर्धा तास वेळ काढून तुम्ही हातापायांची हालचाल केली. तर तुम्हाला तुमच्या तब्येतीत लगेच फरक जाणवू शकतो. तसेच आपण फीटही राहतो. 


2. ग्रीन टी प्या : 


खरंतर कोणत्याही गोष्टीचं व्यसन वाईटच. परंतु, तुम्ही तंदुरूस्त राहण्यासाठी दररोज सकाळी ग्री-टी पिऊ शकता. यामुळे तुम्हाला डिटॉक्सिफाई करण्यास मदत मिळू शकते तसेच यामुळे तुमची चयापचय क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून रेग्युलर चहा पिण्यापेक्षा एक ते दोन वेळा ग्रीन टी चे सेवन करा. 


3. मेडिटेशन करा : 


रोजच्या व्यवहारात महिला इतक्या व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. अशा वेळी दिवसातून काही वेळ काढा आणि मेडिटेशन करा. यामुळे तुमच्या मनातील सगळे विचार दूर होतील. तसेच मनातून तुम्हाला प्रसन्न वाटेल. 


4. योग्य आहार घ्या : 


अनेकदा घरच्यांची काळजी घेताना सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच, जेवताना रात्रीचे शिळे अन्न खाल्ले जाते. यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. तसेच यामुळे अॅसिडीटी, पित्त, अपचन, भूक नसणे यांसारख्या समस्या उद्भवतात. 


5. चांगली झोप : 


दिवसातून किमान 6 ते 8 तास झोप ही प्रत्येकानेच घ्यायला हवी. पुरेशी झोप मिळाल्यामुळे काम करण्यास नवीन ऊर्जा मिळते. मन प्रसन्न होते आणि मानसिक थकवा दूर होतो. त्यामुळे पुरेशी झोप ही हवीच. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :