एक्स्प्लोर

Bread and Health: दररोज उपाशी पोटी ब्रेड खाताय? शरीराला होईल नुकसान, नकळत जडतील आजार

Bread and Health: ब्रेडमध्ये कमी कार्बोहायड्रेट असते त्यामुळे ते आरोग्यास हानी पोहोचवत नाही पण हे खरे आहे का? ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? 

Bread and Health:  अनेक घरांमध्ये ब्रेड हा आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. ऑफिससाठी जेवणाचा डबा असो किंवा मुलांच्या शाळेचा टिफिन, त्यासाठी ब्रेडला प्राधान्य दिले जात आहे  काही लोक फक्त घरी शिजवलेले अन्न देण्यास प्राधान्य देतात. तर, दुसरीकडे, काही लोकांच्या मते, ब्रेड हा हलका नाश्ता असून आणि सहज पचतो. ब्रेड हा आपल्या आधुनिक जीवनशैलीचा दिवसेंदिवस इतका महत्त्वाचा भाग बनला आहे की तो कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतो. काही लोकांना वाटते की ब्रेडमध्ये कमी कार्बोहायड्रेट असते त्यामुळे ते आरोग्यास हानी पोहोचवत नाही पण हे खरे आहे का? ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही? 

उपाशी पोटी खाऊ नये ब्रेड

बाजारापासून घराघरात अनेक प्रकारचे समज-गैरसमज पसरले आहेत. कमी किंमतीमुळे ब्रेड हे अनेकांसाठी जेवणाचा महत्त्वाचा घटक,  खाद्यपदार्थ असू शकतो.  ग्रेन्स फूड फाउंडेशनच्या ( Grains Food Foundation) मते, ब्रेडमध्ये फोलेट, फायबर, लोह, बी जीवनसत्त्वे आणि बरेच काही घटक असतात. पण रिकाम्या पोटी फक्त ब्रेड खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण तुम्ही ब्रेड हे एकदमच आरोग्यासाठी वाईट आहे, असे म्हणू शकत नाही. 
अनेक आहारतज्ज्ञ,  नाश्त्यात ब्रेडचा समावेश करण्यास सांगतात. पण व्हाईट ब्रेड ऐवजी मल्टी-ग्रेन ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेडचा समावेश करण्याचा सल्ला देतात. 

ब्रेडमध्ये असतात हे घटक

कॅलरीज: 82
प्रथिने: 4 ग्रॅम
एकूण चरबी: 1 ग्रॅम
चरबी: 0 ग्रॅम
कार्बोहायड्रेट: 14 ग्रॅम
फायबर: 2 ग्रॅम
साखर: 1 ग्रॅम

रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्ल्यामुळे होईल हे नुकसान

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता 

रोज रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने साखरेची पातळी खूप वाढू शकते. त्याचा हाय ग्लायसेमिक इंडेक्स तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो. ब्रेडमध्ये अमायलोपेक्टिन ए असते. ज्यामुळे साखरेची पातळी वाढते. उपाशी पोटी ब्रेड दररोज खाल्ल्याने मधुमेह, किडनी स्टोन आणि हृदयविकारही होऊ शकतो.

वाईट कोलेस्ट्रॉल वाढवते

व्हिटॅमिन ई आणि फायबर चे प्रमाण ब्रेडमध्ये फारच कमी असतात. त्यामुळे रोज खाल्ल्यास शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

वजन वाढू शकते

दररोज ब्रेड खाल्ल्याने शरीराचे वजन वाढू लागते. याची सुरुवात तुम्हाला प्रथम बद्धकोष्ठतेपासून होते. पुढे जाऊन, चयापचय कमी होईल. त्यानंतर शरीरात प्रोटीन आणि फॅट जमा होण्यास सुरुवात होते आणि कार्बोहायड्रेट साखरेमध्ये बदलणे सुरू होईल. यामुळे वजन वाढू लागते. व्हाईट ब्रेडमुळे हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.

(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणत्याही उपचारासाठी, डाएटसाठी आहारतज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.)

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 Superfast News :टॉप 60 सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 28 March 2025 : ABP Majha : 9 PmSantosh Deshmukh Case Update : देशमुख हत्या प्रकरण, आरोपी सुदर्शन घुलेने सांगितली संपूर्ण घटनाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
Embed widget