Light Dinner Recipe For Weight loss : अनेक जण लठ्ठपणाच्या समस्येपासून त्रस्त आहे. बिघडलेली जीवनशैली या वाढत्या वजनाचं मुख्य कारण आहे. अपुरी झोप, अवेळी जेवण करणे आणि पुरेसा पौष्टिक आहार न घेणे, यामुळे वजन वाढते. काही जण व्यायाम (Exercise) तर काही जण डाएटिंगचा (Diet) अवलंब करत वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात. प्रथिने आणि फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने पोट भरत आणि वजन कमी होण्यासही मदत होते. यासाठी तुम्ही जेवणाच्या वेळा पाळत योग्य आहार घेणं गरजेच आहे. रात्रीच्या जेवणात हलका आणि पौष्टिक आहार मिळण्यासाठी येथे सांगितलेल्या अन्नपदार्थांच्या समावेश करा.


पालक डाळखिचडी
पालक डाळखिचडीमध्ये हिरव्या हिरव्या पालेभाज्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6, B9 आणि E सारख्या जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. तसेच हा लोहाचा एक उत्तम स्रोत आहे. हिरव्या पालेभाज्यामध्ये कॅरोटीनोइड्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात आढळते. 


साबुदाणा खिचडी
साबुदाणा हा कसावाच्या मुळांपासून काढलेला एक नैसर्गिक स्टार्च आहे. ते दिसायला मोत्याच्या आकाराचे असतात. यामध्ये कर्बोदकं (Carbs) भरपूर प्रमाणात असतात. उपवासासाठी साबुदाणा खाल्ला जातो. तुम्ही ते हलका नाश्ता किंवा रात्रीचे जेवण म्हणून साबुदाणा खाऊ शकता. यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल.
 
मूग डाळीचा पराठा
पिवळी मूग डाळ फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे, जे रक्तदाब राखण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते.
 
पपई
पपईमध्ये पपेन नावाचा पदार्थ असतो, यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हे पचन्यासाठी हलकं असल्याने यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
 
ओट्स इडली
ओट्स इडली हे भरपूर प्रमाणात फायबर असलेलं अन्न आहे. हे अतिशय हलकं आणि चवदार आहे. नाश्ता आणि रात्रीच्या जेवणात तुम्ही ओट्स खाऊ शकता. दक्षिण भारतात हे खूप आवडीने खाल्लं जातं. यामध्ये कॅलरीज कमी असल्याने वजनही कमी करता येते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :