Hare Care Tips : केस हा आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपले केस सुंदर आणि मजबूत असावे, अशी महिला असो वा पुरुष प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही जण महागडे प्रोडक्ट्स वापरतात. पण हे करण्यापेक्षा तुम्ही केसांच्या समस्येची मूळ कारण शोधून त्यावर उपाय केल्यास तुमच्या केसांच्या संदर्भातील सर्व समस्या दूर होतील. केस, निरोगी, चमकदार बनवायचे असतील तर, तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. फक्त महागडे प्रोडक्ट्स वापून काही उपयोग होणार नाही. केस आतून मजबूत होणं आवश्यक आहे. यासाठी खाली सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या.


मालिशसाठी कोमट तेल वापरा


केस धुण्यापूर्वी मालिश करण्याची सवय करा. यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा कोणतंही तेल वापरू शकता. मात्र, याआधी ते हलके गरम करा. आता याने तुमच्या टाळूची मालिश करा. याशिवाय तुम्ही आले किसून कोणत्याही केसांच्या तेलात मिक्स करून काही दिवस राहू द्या, त्यानंतर त्याचा नियमित वापर करा, लवकरच तुमची कोंडा दूर होईल.


व्हिटॅमिन 'ई' असलेले पदार्थ खा


 त्वचा आणि केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही आहारात व्हिटॅमिन ई समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. यामुळे केस आणि त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते. व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खाऊनही कोरडेपणाची समस्या कमी करू शकता. व्हिटॅमिन ईची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही या गोष्टींना तुमच्या आहाराचा भाग बनवा. 


जंक फूट टाळा


अनेकदा फास्ट फूड देखील केस गळण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे फास्ट फूडचं सेवन टाळत पोषक आहार घ्या.


पुरेशी झोप गरजेची 


आरोग्यासंबंधीत कोणत्याही समस्या ही तुमचा आहार आणि झोपेशी संबंधित असते. योग्य संतुलित आहारासोबतच पुरेशी झोपा मिळणंही गरजेच आहे. त्यामुळे किमान सात ते आठ तास झोप घेतल्यास तुमच्या केस आणि त्वचेसोबतच आरोग्यासंबंधित इतर समस्याही दूर होतील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या