Side Effects Of Cold Water : सावधान! थंड पाणी पिताय? होईल नुकसान, वाचा सविस्तर
Side Effects Of Cold Water : उन्हाळ्यात गरमीमुळे हैराण होऊन आपण थंड पाणी पितो. मात्र जास्त थंड पाणी प्यायल्याने मेंदू गोठण्याची (Brain Freeze) समस्या उद्भवू शकते.

Side Effects Of Cold Water : उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे किती पाणी प्यायले तरीही ते पुरेसं ठरतं नाही. कितीही पाणी प्यायलं तरी तहान भागत नाही. सारखी तहान लागते. यामुळे लोक थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स अधिक प्रमाणात पिताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की थंड पाणी तुमची तहान भागवत असले तरी ते तुमच्यासाठी किती हानिकारक ठरू शकतं. आम्ही तुम्हाला अशाच काही सांगणार आहोत की थंड पाणी किंवा शीतपेय प्यायल्याने आरोग्यावर कोणते वाईट परिणाम होतील. जाणून घ्या.
फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी कृत्रिम पद्धतीने थंड केलं जातं. याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त थंड पाणी तुमचं शरीर सहन करू शकत नाही आणि हे आरोग्यासाठी घातक ठरते.
लठ्ठपणा वाढतो
थंड पाणी तुमच्या शरीरात साठलेली चरबी आणखी घट्ट करते. यामुळेच वजन कमी करण्यात अडचण येते. नेहमी थंड पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे वजन कमी करताना कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
बद्धकोष्ठतेची (अपचन) तक्रार
थंड पाणी प्यायल्याने आपली आतडे आकुंचन पावतात, त्यामुळे आतडे पचनाचे काम योग्य प्रकारे करू शकत नाहीत. जर आतडे त्यांचे काम सुरळीतपणे करत नसतील तर अशावेळी बद्धकोष्ठतेच्या तक्रारी उद्भवतात.
घसा दुखणे
थंड पाणी प्यायल्याने घसा खवखतो किंवा खोकला येतो. म्हणून कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना थंड पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही.
डोकेदुखी समस्या जाणवते
अधिक थंड पाणी प्यायल्याने मेंदू गोठू शकतो. थंड पाणी मणक्याच्या संवेदनशील नसांना थंड करतो, ज्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि डोकेदुखी होते.
पाणी पिताना काय काळजी घ्यावी?
उन्हाळ्यात गरम, कोमट किंवा थंड पाणी पिण्याऐवजी सामान्य तापमानात असलेले पाणी प्या. यामुळे तुमची तहानही भागेल आणि कोणतीही हानी होणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Summer Skin Care : त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी घरीच बनवा 'हे' स्क्रब
- Health Tips : जेवल्यानंतर लगेच करु नका 'ही' चूक, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
- Health Tips : व्यायाम केल्यानंतर लगेच चुकूनही करु नका 'या' गोष्टी, होईल नुकसान
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























