Remedies For Pollution : दिवाळीचा (Diwali 2022) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी म्हटलं की फटाके, रोषणाई, गोडा-धोडाचे पदार्थ आलेच. दिवाळी हा प्रत्येकाच्या आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. मात्र, दिवाळीत फटाक्यांमुळे, त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे  अनेकांना त्रास होतो. फटाक्यांवर बंदी असली तरी मात्र, अनेकांची दिवाळी फटाक्यांशिवाय अपूर्णच असते. मात्र, याच प्रदूषणामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. श्वसनाचे आजार होण्याचा धोकाही वाढला आहे.    


प्रदूषणामुळे डोळ्यात जळजळ, धाप लागणे, चेहरा लाल होणे, खोकला अशा अनेक समस्या जाणवू लागतात. या प्रदूषणाचा फटका लहान मुले आणि वृद्धांनाही बसतो. अशा वेळी, अनेक घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक उपाय आहेत जे शरीराला आतून मजबूत बनवण्यास आणि श्वासोच्छवासाची समस्या दूर करण्यास मदत करतात. प्रदूषण टाळण्यासाठी घरगुती उपाय कोणते ते जाणून घ्या.


प्रदूषण टाळण्यासाठी घरगुती उपाय


नाकाला तूप लावा : नाकात तूप किंवा तेल लावल्याने अनेक फायदे होतात. त्यामुळे दूषित हवेचा प्रभाव रोखण्यास मदत होते. शुद्ध गाईच्या तुपाचा एक थेंब सकाळ संध्याकाळ नाकात टाका. यामुळे नाक आणि श्वसनमार्ग दोन्ही साफ होतील. यामुळे दूषित पदार्थ फुफ्फुसांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. 


गूळ खा : शरीर निरोगी ठेवण्यासाठी गुळाचे सेवन नक्की करा. गूळ पचनास मदत करतो आणि शरीराला उष्णता देतो. तसेच श्वासोच्छवासाच्या समस्या दूर होण्यास आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत होते. गूळ खाल्ल्याने फुफ्फुसे स्वच्छ होतात. गुळामध्ये लोह असते जे रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा योग्य राखण्यास मदत करते. 


त्रिफळा खा : त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पोटाच्या समस्या कमी होतात. पण त्रिफळा प्रदूषणापासूनही तुमचे रक्षण करते. दिवाळीपूर्वी तुम्ही दररोज 1 चमचे त्रिफळाचे सेवन करावे. रात्री झोपताना मध आणि कोमट पाण्यात मिसळून प्या. याच्या मदतीने तुम्ही प्रदूषणाचे गंभीर परिणाम कमी करू शकता. 


आलं खा : दिवाळीच्या दिवशी हवामानातही थोडाफार बदल होतो. थंडी सुरू होते, या ऋतूत आजारी पडण्याचा धोका सर्वाधिक असतो. बदलत्या ऋतूमध्ये आल्याचे सेवन जरूर करा. यामुळे प्रदूषण आणि खोकल्यापासूनही आराम मिळेल. आल्याचा रस मधात मिसळून प्या. याशिवाय तुम्ही आल्याचा चहाही पिऊ शकता. 


दररोज वाफ घ्या : जर तुम्हाला प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास होत असेल तर त्यासाठी दररोज वाफ घ्या. यामुळे तुमचे नाक आणि श्वासनलिका उघडेल आणि तुम्हाला इतरांपेक्षा कमी त्रास होईल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :