Eye Care Tips : बदलत्या काळानुसार जर कोणती समस्या सर्वसामान्य होत चाललीये तर ती म्हणजे डोळ्यांची (Eyes) दृष्टी कमजोर होणे. सध्याच्या काळात डिजिटल स्क्रिनिंगचे प्रमाण वाढत चालले आहे. म्हणजेच, मोबाईल, टेलिव्हिजन, लॅपटॉप यांसारख्या उपकरणांचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकदा डोळ्यांची दृष्टी कमी होण्यामागे हे मुख्य कारण ठरते. जर तुम्हीसुद्धा डोळ्यांच्या या समस्येचा सामना करत आहात तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत जे तुमच्या डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतील.
डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय :
बदामाचे सेवन करा
डोळ्यांसाठी बदामाचे सेवन करणं फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे एंटी-ऑक्सिडेंट्स डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी रोज रात्री भिजवलेले बदाम सकाळी उठल्यावर खावेत. त्याचबरोबर तुम्ही दुधाबरोबरदेखील बदामाचे सेवन करू शकता. यामुळे तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होईल.
आवळा
आवळा, व्हिटॅमिन सी समृद्ध, दृष्टी वाढविण्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आहे. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि काही पोषक घटक असतात. तसेच, हे रेटिनल पेशी सुधारण्याचे कार्य करते. आवळ्याच्या रसाचे काही थेंब पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा प्यावे. याशिवाय आवळ्याचा रस मधात मिसळूनदेखील तुम्ही पिऊ शकता.
व्हिटॅमिन ए
आपल्या आहारात व्हिटॅमिन ए समाविष्ट करणे डोळ्यांसाठी चांगले आहे. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या काळजीसाठी आवश्यक पोषक आहे. गाजर, पपई, आवळा, हिरव्या आणि पालेभाज्या तसेच सिमला मिरचीमध्ये देखील व्हिटॅमिन ए असते.
सुक्या मेव्याचे सेवन करा
बदामाव्यतिरिक्त, मनुका आणि अंजीर हे देखील असे ड्रायफ्रुट्स आहेत जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. यामध्ये आढळणारे पोषक तत्व डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतात. बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने जास्त फायदा होतो.
या व्यतिरिक्त तुम्ही वारंवारडोळे स्वच्छ करणे, डोळ्यांती घाण साफ करणेदेखील गरजेचे आहे. याशिवाय डोळ्यांशी संबंधित काही व्यायामही करणे गरजेचे आहे. जसे की, डोळे वर-खाली करणे, गोल फिरवणे. याशिवाय डोळे कधीच चोळू नका किंवा खाजवू नका. मात्र, अगदीच जर डोळे जळजळ करत असतील तर कपड्यात फुंकून पाणी डोळ्यांना लावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :