Rice Effect on Health : भात (Rice) हा अन्नातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. अनेकांना तर भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. भाताचे अनेक प्रकारही आहेत. जसे की, राजमा-भात, छोले-भात, डाळ-भात, मासे-भात यांसारखे घरगुती अन्न आपल्या शरीराची नाही तर आपल्या आत्म्याची भूक भागवतात. मात्र, याच भाताच अतिरेक केला तर शरीराला नुकसान पोहोचू शकते. हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर ही माहिती नक्की वाचा. भात खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेही आहेत हे लक्षात घ्या. 


भातामुळे होणारी समस्या : 


पांढरा तांदूळ : 100 ग्रॅम तांदळात 123 कॅलरीज आणि 0.4 ग्रॅम फॅट असते. तर 2.9 ग्रॅम प्रथिने आणि 30 ग्रॅम कर्बोदके असतात. जर तुम्ही दिवसाच्या तिन्ही जेवणात जास्त वेळ भात खाल्लात तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतो.


जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने शरीराला होणारे नुकसान


पोट फुगण्याची समस्या 


जे लोक जास्त वेळ भात खातात त्यांना काही वेळाने पोटात जळजळ, छातीत जळजळ आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या सुरू होतात. हे तांदळात आढळणाऱ्या स्टार्चमुळे होते. त्यामुळे कमी प्रमाणात भात खा. 


वजन वाढण्याची समस्या :


जास्त भात खाल्ल्याने तुमचे वजन लवकर वाढू शकते. अनेकजण भात खाल्ल्याबरोबर लगेच झोपतात. त्यामुळे ही समस्या आणखी वाढू लागते. याऊलट, जे लोक संतुलित प्रमाणात भात खातात आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय देखील असतात, त्यांच्या शरीरावर त्याचा असा प्रभाव क्वचितच होतो.


रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे
 
तांदूळ ग्लायसेमिक इंडेक्समध्ये उच्च ग्लायसेमिक पदार्थांच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आला आहे . Glycemic Indes (GI) द्वारे, हे मोजले जाते की शरीर कोणत्या अन्नातील कर्बोदकांमधे किती वेगाने रूपांतरित करते आणि ही साखर शरीरात रक्तामध्ये वेगाने विरघळते. या श्रेणीतील सर्व खाद्यपदार्थ 0 ते 100 च्या दरम्यान आहेत, 0 ते 55 चा ग्लायसेमिक इंडेक्स कमी GE, 56 ते 69 मध्यम GI आणि 70 ते 100 उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आहे.


तांदळाचे पदार्थ आणि त्यांचा वापर


भाताबरोबरच त्यापासून बनविलेले पदार्थही खूप चांगले लागतात. देशातील विविध राज्यांमध्ये भातापासून विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविले जातात. ते पदार्थ खाण्यात काही नुकसान नाही. पण हे पदार्थ कमी प्रमाणात खावेत. पोट भरण्यासाठी खाल्ले तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :