World's First Pig Kidney Transplant Into Human: शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य किडनी करते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर, किडनीचे विकार जडतात. ज्यामुळे जीवन त्रासदायक होऊन बसते. एका किडनीचे काम थांबले तरी, दुसऱ्या किडनीच्या साह्याने शरीराचे सर्व काम सुरळीत पार पडतात. मात्र, दोन्ही किडनीचे काम पूर्णपणे ठप्प झाल्यास म्हणजे किडनी फेल झाल्यास पेशंटना डायलिसिस हा एकमेव पर्याय उरतो. मात्र, न्यूयॉर्कमधील शल्यचिकित्सकांनी किडनीच्या संबंधित त्रासाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी महत्वाचा प्रयोग केला आहे. या शल्यचिकित्सकांनी एका व्यक्तीच्या शरिरात चक्क डुकराची किडनी बसवली आहे. महत्वाचे म्हणजे, हा प्रयोग यशस्वी झाला असून किडनीच्या त्रासापासून ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आशेचा किरण ठरला आहे. 


द सनच्या अहवालानुसार, जगात प्रथमच मानवी शरीरात डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. हा प्रयोग अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील एनव्हाययू लँगोन हेल्थ मेडिकल सेंटरमधील सर्जनांनी केला आहे. महत्वाचे म्हणजे, प्रत्यारोपणानंतर डुकराची किडनी रुग्णाच्या शरीरात योग्यरित्या कार्य करत आहे. शस्त्रक्रियेत सहभागी डॉक्टरांच्या पॅनेलचे प्रमुख डॉ रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. रॉबर्ट म्हणाले की, ज्या रुग्णामध्ये डुकराच्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्या रुग्णाचा ब्रेन बऱ्याच काळ डेड होता. मात्र, त्याचे हृदय आणि इतर अवयव काम करत होते. संबंधित रुग्णांच्या कुटंबातील सदस्यांची परवागणी घेऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 


या शस्त्रक्रियेनंतर पुढील दोन-तीन दिवस रुग्णावर लक्ष ठेवण्यात आले. परंतु, रुग्णांच्या शरीराने डुकराची किडनी स्वीकारल्याने डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. डुकराच्या किडनीने रुग्णांच्या शरिरात निर्माण होणाऱ्या कचरा यशस्वीरित्या फिल्टर होतआहे. डुकराची किडनी आणि मानवाची किडनी साम्य पद्धतीने कार्य करीत असल्याचे डॉक्टरांच्या निर्दशनात आले आहे. 


डॉ रॉबर्ट मॉन्टगोमेरी म्हणाले की, मानवी शरिरात डुकराची किडनी योग्यरित्या कार्य करत आहे. त्याचे आतापर्यंतचे सर्व निकाल चांगले आले आहेत. किडनी निकामी झाल्यानंतर रुग्णाची क्रिएटिनिन पातळी असामान्य झाली होती. आता डुकराची किडनी लावल्यानंतर ती पातळी पुन्हा सामान्य झाली आहे. अहवालानुसार जगात मानवी अवयवांची मोठी कमतरता आहे. यामुळे दररोज हजारो रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी विविध देशांतील शास्त्रज्ञ डुकरावर बराच काळ संशोधन करीत आहेत. 


संबंधित बातम्या- 


Health Care Tips : शाकाहारी आहात? 'या' पदार्थांचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर


Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 1 ग्लास काकडीचा ज्यूस


Benefits Of Eating Rice: या 4 रंगाचे तांदूळ आहेत आरोग्यासाठी फायदेशीर