Benefits Of Eating Rice: दररोज जेवणामध्ये वरण भात, फोडणीचा भात किंवा मसाले भात इत्यादी भाताचे प्रकार खायला अनेकांना आवडतात.  अनेकांना फक्त पांढऱ्या रंगाचा तांदूळ माहित असेल. पण तांदळाचे पांढरा, लाल, काळा आणि ब्राउन अशा रंगाचे प्रकार देखील आहेत.  तांदळामध्ये अॅंटीऑक्सीडेंट, फाइबर प्रोटीन  आणि अन्य व्हिटॅमिन असतात. जर तुम्हाला शरीरात व्हिटॅमिनचे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही या 4 रंगाच्या तांदळांचा आहारामध्ये सामावेश करा. पाहूयात कोणत्या रंगाचे तांदूळ हे आरोग्यासाठी चांगले आहेत. 
 
पांढऱ्या रंगाचा तांदूळ (White Rice)
रोजच्या जेवणामध्ये आपण पांढऱ्या रंगाच्या तांदळाचा वापर करतो. यामध्ये इतर तांदळांच्या तुलनेत कमी प्रोटीन असतात. पण एंटीऑक्सिडेंट आणि इतर आवश्यक पोषक तत्वे जास्त असतात.  या तांदळामध्ये  कॅल्शियम आणि फोलेटचे प्रमाण जास्त असते.  


तपकिरी रंगाचा तांदूळ (Brown Rice)
पांढऱ्या तांदळापेक्षा तपकिरी रंगाचा तांदूळ हा जास्त पोषक असतो. तपकिरी रंगाच्या तांदळामध्ये म्हणजेच ब्राउन राइसमध्ये फायबर आणि प्रोटिनचे प्रमाण जास्त असते. 


Health Care Tips : तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे; अनेक आजारांवरही गुणकारी


लाल रंगाचा तांदूळ (Red Rice)
लाल रंगाच्या तांदळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. लाल रंगाचा तांदूळ खाल्याने  ब्लड प्रेशर कमी होते. तसेच लाल रंगाच्या तांदळाचा भात खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये लाल रंगाच्या तांदळाचा समावेश करावा. 


World Food Day 2021: जागतिक अन्न दिन; जाणून घ्या महत्व, इतिहास आणि या वर्षाची थीम


काळ्या रंगाचा तांदूळ (Black Rice)
काळ्या रंगाच्या तांदळामध्ये प्रोटिन, फायबर आणि ई व्हिटॅमिन एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त आहे. ब्लडमधील शूगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी काळ्या रंगाच्या तांदूळ उत्तम आहे. 


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम


वजन वाढलंय? कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? 'या' सोप्या ट्रिक्स करुन पाहा