Weight Loss Tips : बाजारात बेली फॅट बर्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या सप्लिमेंट्स मिळतात. पण या सप्लिमेंट्सचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट आणि वर्कआउट करावे. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये  फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.  काकडीचा ज्यूस देखील तुमचे वजन कमी करू शकतो.  काकडीच्या ज्यूसने तुमच्या शरीरातील चर्बी कमी होते.  जाणून घेऊयात काकडीचा ज्यूस तयार करण्याची सोपी पद्धत. 


काकडीचा ज्यूस तयार करण्यासाठी लगणारे साहित्य 
1 ग्लास पाणी,1 काकडी, 1 लिंबू, काळं मिठ


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


काकडीचा ज्यूस तयार करण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचं साल काढा. काकडी चिरून घ्या. चिरलेली काकडी एका पाणी असलेल्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा जारमध्ये ठेवा. त्यापाण्यामध्ये लिंबू पिळा. हे पाणी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा.त्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन ते प्या. दररोज उपाशी पोटी काकडीचं ज्यूस प्यायल्याने बेली फॅट्स कमी होतात. काकडीच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम,  जिंक फ्लेवोनोइड्स आणि मॅग्नेशियम इत्यादी घटक असतात. काकडीचा ज्यूस प्यायल्याने पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.  


जर तुम्हाला  वजन कमी करायचे असेल तर तुम्ही साखर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे टाळावे. लो- कार्ब असणारे पदार्थ आहारात घ्यावेत. रिफाइन कार्ब्समुळे वजन वाढते. आहारामध्ये वेगवेगळ्या धान्याचा समावेश करा धान्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल व वजन कमी होईल. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होतात. तसेच व्यायामुळे तुमची पचनक्रिया देखील  चांगली होण्यास मदत होते. 


Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा


 टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.