Vegan Diet Tips: अनेक लोक मांसाहार खाणे सोडत आहेत. नॉन व्हेज पदार्थांमध्ये पोषक तत्वे जास्त असतात. पण शाकाहारी लोकांना ही तत्वे मिळवायची असतील तर या  हेल्दी पदार्थांचा त्यांनी  आहारामध्ये समावेश करावा. 


शरीरात विटॅमिन बी - 12 असणे आहे गरजेचे
जर कोणी वेगन डाएटला फॉलो करत असेल तर ते अंडी, चिकन, मटण आणि डेअरीच्या उत्पादने खाणे टाळतात. हे सर्व पदार्थ विटामिन बी12 चे प्रमुख स्त्रोतच आहेत. पण  शाकाहारी लोकांनी शरीरातील  विटॅमिन बी - 12 वाढवण्यासाठी आहारामध्ये सोयाबीन आणि मशरूम यांचा समावेश करावा. 


आयर्नचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खावेत
शाकाहारी लोकांनी त्यांच्या जेवणामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा.  आयर्नचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन आपल्याला अनेक आजार होऊ शकतात.  शरीरातील  आयर्नचे प्रमाण वाढवण्यासाठी बिन्स आणि फळे खावेत. तसेच साइट्रिक फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करावा. आर्यनचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही काळे तीळ, खजूर, गहू , मनुके, बीट, गाजर आणि अंडी खाऊ शकता. त्यामध्ये बरीच आयर्न मिनरल असतात. तसेच हिरव्या भाज्या आणि फळांमध्येही आयर्न असते. आपल्या शरीरात आयर्न चांगले राखण्यासाठी, व्हिटॅमिन-सी असलेले अन्न देखील खाणं गरजेचं आहे. 


Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 1 ग्लास काकडीचा ज्यूस


ड्राय फ्रूट्स 
मांसाहार सोडून शाकाहारी आहाराकडे वळणाऱ्यांनी त्यांच्या डाएटमध्ये ड्राय फ्रूट्सचा समावेश करावा. ड्राय फ्रूट्समुळे थकवा जाणत नाही. तसेच शरीरात उर्जा निर्माण होते. 


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. 


Aditi Rao Hydari : नियमित योगा, डान्स अन् हेल्दी डाएट; अदिती राव हैदरीचा फिटनेस फंडा