Monsoon Health Care Tips : पावसाळ्यात आजारपण जास्त होण्याचा धोका असते. पावसाळ्यात काहींना बदलत्या वातावरणामुळे किंवा भिजल्यामुळे वारंवार सर्दी-पडशाचा त्रास होतो. याकडे दुर्लक्ष करणं फार महागात पडू शकते. पावसाळ्यात होण्याऱ्या सर्दीपासून वाचण्यासाठी अनेक रामबाण उपाय आहेत. याचा वापर करुन तुम्ही सर्दी-पडशापासून सुटका मिळवू शकता. कसा ते जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.


केस ओले राहू देऊ नका.
पावसाळ्यात भिजल्यामुळे किंवा केस धुतल्यावर केस ओले राहू देऊ नका. केस ओले राहिल्याने सर्दी होण्याची शक्यता असते. शिवास केस ओले राहिल्याने डोक्यात संसर्ग होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे केस ओले राहू देऊ नका.


वाफ घ्या. (Steam)
पावळ्यात सर्दी किंवा कफ झाला तर सर्वप्रथम वाफ घ्या. वाफ घेतल्याने गरम हवा नाकात आणि तोंडात जाते. त्यामुळे सर्दी किंवा कफ कमी होतो.  वाफ घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये निलगिरी तेलाचे दोन थेंब टाका.  दिवसातून दोन वेळा या पाण्याची  घेतल्यानंतर तुमची सर्दी कमी होईल. 


गरम पाण्याने गुळण्या करा.
जर हिवाळ्यात सतत कफ होत असेल तर दिवसातून दोन वेळा गरम पाण्याने गुळण्या करा. या पाण्यामध्ये मीठ टाका. यामुळे कफ कमी होतो. 


काढा प्या.
पावसाळ्यात सर्दी आणि पडशापासून सुटका करायची असेल, तर घरगुती काढा प्या. यामुळे तुमची सर्दीपासून सुटका होऊन धशालाही आराम मिळेल.


1. अडुळशाचा काढा.
अडुळशाचा काढा हा सर्दी आणि खोकल्यावर रामबाण उपाय आहे. यासाठी भांड्याच दोन कप पाणी घेऊन त्यामध्ये अडुळशाची पाने, तुळशीची पानं, ज्येष्ठमध, आळशी, थोडासा गुळ आणि आल्याचा तुकडा टाका. हे मिश्रण मंद आचेवर उकळवा आणि भांड्यातील पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. आता हे मिश्रण गाळून घ्या आणि कोमट असताना चहाप्रमाणे प्या.


2.तुळशी आणि हळदीचा काढा.
हा काढी बनवण्यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. यामध्ये अर्धा चमचा हळद, 10 ते 12 तुळशीची पानं, दोन चमचे मध, 2 ते 3 लवंग आणि दालचिनीचा छोटा तुकडा टाका. हे मिश्रण 15 मिनिटे उकळवा. हे मिश्रण गाळून घ्या. थंड होण्याआधी कोमटक असतानाच प्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :