Monsoon Foot Care : पावसाळ्यात संसर्गजन्य आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्यासोबतच हातापायांची योग्य निगा राखणं आवश्यक आहे. हातांची आपण योग्य काळजी घेतो, पण अनेक वेळा पायांकडे दुर्लक्ष होते. पावसाळ्यात सतत खराब पाणी किंवा चिखल यांमुळे पायांना माती लागते किंवा पावसामुळे सतत पाय ओले राहतात. यामुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यात पायांची जास्त काळजी (Pedicure At Home) घेणं आवश्यक आहे.


पावसाळ्यात पायांची काळजी घेण्यासाठी तुम्ही घरीच पेडीक्योर करु शकता. जाणून घ्या यासाठीच्या सोप्या टिप्स आणि त्याचे फायदे.


पेडीक्योर करण्याचे फायदे


1. पेडीक्योर केल्याने पाय सुंदर दिसतात.
2. पेडीक्योर केल्याने पायावरील डेड स्किर निघून जाते आणि टाचांना भेगा पडण्याच्या समस्येपासून सुटका होते.
3. पेडीक्योर केल्यानं पायांना नवी चमक येते.
4. पेडीक्योर करताना पायांची मसाज केली जाते. यामुळे तुमचा थकवि निघून जाऊन शरीर रिलॅक्स होते.
5. पेडीक्योर करताना स्क्रब केल्याने पायातील रक्ताभिसरणही सुधारते.


घरीच पेडीक्योर कसं करावं?
1. एका टब किंवा बादलीमध्ये कोमट पाण्यात पाय भिजवा.
2. या पाण्यात आता थोडा शॅम्पू टाका आणि यामध्ये पाय 10 ते 15 मिनिटं ठेवा. 
3. यानंतर पाण्यातून पाय बाहेर काढा आणि पायांना स्क्रब करा. 5 ते 10 मिनिटं स्क्रब करुन पाय स्वच्छ करा.
4. आता प्यूबिक स्टोन किंवा फूट ब्रशने पाय घासा.
5. पायांवर कुठे डेड स्किन असेल तर ती नेलकटरने काढून टाका.
6. पायाचा घोटा आणि नखांजवळील भाग चांगला घासून पाण्याने साफ करा.
7. आता पाय टॉवेलने कोरडे करा आणि त्यावर मॉश्चराईजर लावा.
8. पायांची वाढलेली नखं कापा. पावसाळ्याच वाढलेल्या नखांमुळे इंम्फेशन होऊ शकते.
9. आता पायांनी तुमच्या आवडीची नेल पेंट लावा.
10. आता तुमचे पाय सुंदर दिसू लागतील. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :