Monsoon Hair Care Tips : पावसाळ्यात केसांची निगा कशी राखावी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आम्ही आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. पावसाळ्याच केसांची काळजी कशी घ्यायची याबाबत सविस्तर वाचा. या सोप्या टिप्स लक्षात ठेवा आणि यांचा दररोजच्या जीवनात वापरही करा.


पावसाळ्यात अशी घ्या केसांची काळजी


ओले केस विंचरु नका
केस धुतल्यानंतर लगेच केस विंचरण्याची सवय तुमच्या केसांना खराब करू शकते. त्यामुळे केस गुंततात आणि नंतर तुटायला लागतात. म्हणून केस कोरडे होऊ द्या आणि नंतर विंचरा.


ब्लो ड्रायरचा वापर कमी करा


ब्लो ड्रायरच्या अधिक वापरामुळे तुमच्या केसांचे अधिक उष्णतेमुळे नुकसान होते आणि त्यामुळे केस तुटतात. पावसाळ्यात भिजल्यावर केस सुकवण्यासाठी ब्लो ड्रायर जास्त वापर करणं टाळा. जरी तुम्हाला तुमचे केस लवकर ब्लो ड्राय करायचे असतील तर केस किमान 60-70 टक्के केस कोरडे होऊ द्या आणि त्यानंतर ब्लोड्रायरचा वापर करा. 


ओले केस बांधू नका. 
पावसाळ्यात ओले केस बांधू नका. केस धुतल्यानंतर किंवा पावसात केस ओले झाल्यानंतर ते पूर्ण कोरडे होऊ द्या. स्काल्प पूर्ण सुकू द्या. स्काल्प ओला राहिल्यास अॅलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या.


व्हिटॅमिन 'ई' असलेले पदार्थ खा
केसांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही आहारात व्हिटॅमिन ई समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. यामुळे केस आणि त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहते. व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ खाऊनही कोरडेपणाची समस्या कमी करू शकता. व्हिटॅमिन ईची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही या गोष्टींना तुमच्या आहाराचा भाग बनवा. बदाम, सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.


केसांना तेल लावा.
केसांना आठवड्यातून किमान दोन वेळा तेल लावण्याची सवय करा. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल. केस मॉईश्चराईज राहतील. तेल मालिश केल्याने केस कोरडे होण्याच्या समस्येपासून सुटका होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :