Cause Of Heart Attack In Males : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हदयासंबंधित आजारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील काही काळात लोकांमध्ये हदयविकाराच्या घटना वाढताना दिसत आहे. गेल्या काही काळात हदयविकाराच्या झटक्यानं किंवा हदयासंबंधित आजारांमुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येतं. यातही महिलांच्या तुलनेनं पुरुषांमध्ये हदयवविकाराचं (Heart Attack) प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळतं. 


महिलांच्या तुलनेनं पुरुषांमध्ये हदयवविकाराचं प्रमाण अधिक असण्यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? यामागचं एक कारण लाईफस्टाईल आहेच पण याशिवाय यामागचं मोठं कारण पुरुषांची जैविक रचना (Biological Texture) आहे. याच कारणामुळे एकाच आजाराची पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये वेगवेगळी लक्षणं आढळतात. पुरुषांच्या हदयाचा आकार महिल्यांच्या हदयाच्या आकारपेक्षा तुलनेनं मोठा असतो. 


महिलांच हदय पुरुषांच्या हदयापेक्षा जास्त वेगाने धडधडतं. जर एखादी महिला तणावात असेल तर तिचा पल्स रेट वाढतो. तर जेव्ही पुरुष तणावात असतात, तेव्हा त्यांच्या हदयातील धमन्या आकुंचन पावतात, यामुळए ब्लड प्रेशर वाढतो. पुरुषांमधील हदयविकाराची कारणं जाणून घ्या.


पुरुषांमधील हदयविकाराची कारणं 


1. कोलेस्ट्रॉल वाढणं.
हदयविकाराचं एक कारण कोलेस्ट्रॉल वाढणं हेही आहे. धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल प्लेक तयार होतात. कोलेस्ट्रॉल प्लेक म्हणजे कोलेस्ट्रॉल जमा होऊन धमन्याच्या भिंती जाड होतात. कोलेस्ट्रॉल प्लेक तयार झाल्यावर रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. पुरुषांमध्ये सर्वात मोठ्या धमन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल प्लेक तयार होतात. यामुळेच हदयविकाराचा धोका वाढतो.


2. शरीराची कमी हालचाल
पुरुषांच्या शरीराची हालचाल कमी असते. जास्त करुन स्त्रिया सर्व कामांमध्ये अॅक्टिव असतात. याउलट पुरुषांचं काम जास्त बसण्याचं असतं. जसं की ऑफीसमध्ये एका जागी बसून काम, गाडी चालवणं या कामांमध्ये पुरुषांची अधिक हालचाल होत नाही. यामुळे पुरुषांच्या शरीराची जास्त हालचाल होत नाही परिणामी हदयविकाराचा अधिक धोका संभवतो.


3. हाय ब्लड प्रेशरची समस्या
उच्च रक्तदाबाची समस्या हृदयविकाराचा झटका आणि हदयासंबंधित आजाराचं मोठं कारण आहे. पुरुष आणि स्त्रियांमध्ये रक्तदाबाची समस्या वेगळी असते. तरुणांमध्ये तरुणींपेक्षा जास्त उच्च रक्तदाब असतो. उच्च रक्तदाब हे पुरुषांमध्ये हदयविकाराचे मोठं कारण आहे.


4. कमी टेस्टोस्टेरॉन पातळी
कमी टेस्टोस्टेरॉनची पातळी तुमच्या शारीरिक क्षमतेशी संबंधित असते. यामुळे हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे चयापचय चांगले राहते आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. अशा परिस्थितीत टेस्टोस्टेरॉनची कमी पातळी तुम्हाला हृदयविकाराचा रुग्ण बनवू शकते. 


5. मद्यपान आणि धुम्रपान
भारतात मद्यपान आणि धुम्रपान करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक आहे. मद्यपान आणि धुम्रपान यामुळ हदयासंबंधित रोगांचा धोका वाढतो. महिला पुरुषांपेक्षा कमी मद्यपान आणि धुम्रपान करतात. यामुळे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हदयविकाराचा धोका जास्त असतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :