Cholesterol Diet : शरीरातील मेणासारख्या पदार्थाला कोलेस्ट्रॉल (Cholesterol ) असं म्हणतात. हे कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतं, एक चांगलं कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol/HDL) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol/LDL). वाईट कोलेस्ट्रॉलमुळे (Bad Cholesterol) शरीरात रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. यामुळे इतर आजार होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढल्यावर तुम्ही योग्य आहार घेणं आवश्यक आहे. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर काही पदार्थांपासून दूर राहाणंच फायद्याचं ठरु शकतं.
जाणून घ्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणते पदार्थ टाळावेत. (What to Avoid in Cholesterol)
चिकन खाणं टाळावं.
बहुतेकांना चिकन खाणं फार आवडतं. पण जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर मात्र तुम्ही चिकन खाणं बंद करायला हवं. कोलेस्ट्रॉल वाढलं असताना चिकन खाल्यास यामुळे शरीराती बॅड कोलेस्ट्रोल वाढते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे येऊ शकतात.
लाल मांस खाणं टाळावं.
शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर लाल मांस खाणं टाळावं. लाल मांस (Red Meat) म्हणजे सस्तन प्राण्यापासून मिळवलेलं मांस. जसे की, मटण (Mutton), मेंढी (Sheep), डुक्कर (Pork), गोमांस (Beef) यांचं सेवन करणं टाळावं.
दुग्धजन्य पदार्थांचं सेवन कमी करा.
कोलेस्ट्रोल वाढल्यावर दुग्धजन्य पदार्थांचं सेवन कमी करा. दुग्धजन्य पदार्थांमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रोल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रोल वाढल्यावर दुधाच्या पदार्थांचं सेवन कमी करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :