Weight Loss Without Exercise : आजकाल वाढत्या वजनाच्या समस्येनं बहुतेक जण त्रस्त आहेत. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना पाहायला मिळतात. व्यायाम (Exercise) आणि डाएटिंग (Diet) करून लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला जर व्यायाम न करता सोप्या पद्धतीनं वजन कमी करायचं असेल, तर त्यासाठीही पर्याय आहे. तुम्ही काही टिप्स वापरून तुमचं वाढलेलं वजन कमी करु शकता. या टिप्स फॉलो केल्यावर व्यायाम न करताही तुमचं वजन नियंत्रणात राहील.


व्यायाम न करता वजन कसं कमी कराल?


स्वत:ला अ‍ॅक्टिव्ह ठेवा.
फक्त व्यायाम करण्यानेच वजन कमी होत असं नाही. तुम्ही अ‍ॅक्टिव्ह अर्थात सक्रिय राहिल्यास वजन कमी करण्यास मदत होते. फक्त बसणे किंवा झोपण्यापेक्षा शरीराची हालचाल करत राहिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. असे केल्यास तुम्हाला वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याचीही गरज भासणार नाही.


भरपूर प्रमाणात पाणी प्या.
वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यायची गरज आहे. वजन कमी करण्यात पाण्याचा महत्त्वाचा वाटा आहे. कमी पाणी पिण्याची सवय तुमचं वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. जर तुम्हाला व्यायाम न करता वजन कमी करायचं असेल तर दिवसभरात पाणी पिण्यासाठी नक्की वेळ काढा. दर तासाला किमान एक ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला ऊर्जाही मिळेल.


चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहा.
व्यायान न करता वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चरबीयुक्त पदार्थ म्हणजे फॅट असलेल्या पदार्थांपासून दूर राहा. चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळा. आपण दिवसभरात अनेक चरबीयुक्त पदार्थांचं सेवन करतो. जर तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर वजन कमी करण्यासाठी चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहा. यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहिल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :