Men Health: लग्नानंतर सुटलास पठ्ठ्या... लग्न चांगलंच मानवलं बुवा...लग्नानंतर थोडं जरी जाड झालो तरी अशा अनेक उपमा आपल्याला आपले नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडून ऐकायला मिळतात. मुळात लग्न हा पुरुष आणि महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. असं म्हणतात की लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष दोघांनाही अनेक बदल स्वीकारावे लागतात. हे बदल त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही दिसून येतात. अनेक वेळा असे दिसून येते की, लग्नानंतर स्त्री-पुरुषांचे वजन वाढू लागते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. लग्नानंतर पुरुष खाण्या-पिण्यापेक्षा इतर कारणांमुळेही लठ्ठ होतात. कोणती आहेत ती कारणं? जाणून घ्या...
एका अभ्यासात म्हटलंय...
चीनमध्ये झालेल्या एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की, लग्नानंतर पुरुष जाड आणि आळशी होतात. अनेक पुरुषांना पोट फुगल्यासारखे वाटू लागते. त्यांचे वजन वाढू लागते. लग्नानंतर 5 वर्षात पुरुषांचे वजन वाढू लागते. लग्नानंतर ते जास्त कॅलरीयुक्त अन्न खातात आणि व्यायाम कमी करतात हे नाकारता येणार नाही.
5.2 टक्के पुरुषांचे वजन जास्त
शास्त्रज्ञांच्या मते, विवाहामुळे पुरुषांच्या बॉडी मास इंडेक्स (BMI) वर लक्षणीय परिणाम दिसून आला आहे. लग्नानंतर 5.2 टक्के पुरुषांचे वजन जास्त होते, तर लठ्ठपणाचे प्रमाण 2.5 टक्क्यांनी वाढते.
'या' गोष्टींच्या सवयी ठेवणे खूप महत्वाचे
पाश्चिमात्य देशांमध्ये केलेल्या अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जसजसे वय वाढते तसतसे पुरुषांना लठ्ठपणाचा गंभीर धोका असतो. या कारणास्तव, लग्नानंतर निरोगी खाण्याच्या सवयी ठेवणे खूप महत्वाचे आहे.
अभ्यासातून धक्कादायक बाब समोर, नेमकं कशामुळे वाढतं वजन?
ग्नानंतर अनेक पुरुषांचं वजन अचानक वाढू लागते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. इकॉनॉमिक्स अँड ह्युमन बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, एखादी व्यक्ती त्याच्या जिव्हाळ्याच्या नातेसंबंधात जितकी जास्त समाधानी असेल तितकी त्याची लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते. बायकोचं प्रेम, खाणं-पिणं हे जितकं गरजेचं आहे, तितकंच पुरुषांनी व्यायाम करणं, जंकफूड खाणं टाळणं यासारख्या गोष्टी केल्याने वजन नियंत्रणात ठेवावं, जेणेकरून इतर गंभीर आजारांचा धोका उद्भवणार नाही
हेही वाचा>>>
Diwali Travel: दिवाळीची सुट्टी अन् गुलाबी थंडी करा एन्जॉय! 1 दिवसाची सुट्टी घेऊन 4 दिवस प्रवासाचा आनंद घेऊ शकता, कसं ते जाणून घ्या..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )