Diwali Travel: दिवाळी हा सर्वांसाठीच आनंदाचा सण असतो. त्यात थंडीचा महिनाही असल्याने हे दिवस आणखीनच आल्हाददायक वाटतात. हो ना..दिवाळीच्या खास मुहूर्तावर प्रवास करणे जवळपास सर्वांनाच आवडते. या प्रसंगी अनेकजण आपल्या कुटुंबासह त्यांच्या आवडत्या ठिकाणी निघून जातात. प्रवाशांसाठी तर प्रत्येक दिवस सारखाच असतो, पण नोकरदार लोकांसाठी दिवाळीची इतकी दिवस सुट्टी घेणे करणे सोपे नसते, कारण त्यांच्याकडे वेळ कमी असतो. पण तुम्हाला माहित आहे का? दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही फक्त 1 दिवसाची सुट्टी घेऊन 4 दिवस प्रवासाचा आनंद घेऊ शकता, हो हे खरंय... जर तुम्हालाही प्रवासाची आवड असेल, तर दिवाळीत आलेल्या शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्या तुमचे प्रवासाचे स्वप्न पूर्ण करू शकतात. कसे ते जाणून घ्या?


 


दिवाळी लाँग वीकेंड


जर तुम्ही दिवाळीच्या वीकेंडमध्ये प्रवास करण्याचा विचार करत असाल तर 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासह तुमच्या आवडत्या ठिकाणी पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला ३१ ऑक्टोबरला ऑफिसमधून सुट्टी घ्यावी लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही 4 नोव्हेंबरला सुटी घेऊन चार दिवस प्रवासही करू शकता. तारखेवरून समजून घेऊया-



दिवाळीची लाँग वीकेंड कसा प्लॅन कराल?


31 ऑक्टोबर- (गुरुवार- ऑफिसमधून सुटी घेता येईल)
नोव्हेंबर 1- (शुक्रवार- दिवाळीची सुट्टी)
नोव्हेंबर २- (शनिवार-विकेंडची सुट्टी)
नोव्हेंबर ३- (रविवार- शनिवार-रविवार सुट्टी)
4 नोव्हेंबर- (सोमवार- ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकता)


अशा प्रकारे, तुम्ही सोमवार, 31 ऑक्टोबर किंवा 4 नोव्हेंबरला ऑफिसमधून सुट्टी घेऊन 4 दिवस देशातील अनेक अद्भुत आणि सुंदर ठिकाणं एक्सप्लोर करू शकता.


 


दिवाळीत भेट देण्याची उत्तम ठिकाणे


देशात अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक ठिकाणे आहेत, जी तुम्ही दिवाळीच्या खास प्रसंगी एक्सप्लोर करू शकता. तुम्ही कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासह या ठिकाणांना भेट देऊ शकता.


 


वाराणसी - गंगा नदीच्या काठावर हजारो दिवे पाहू शकता


दिवाळीनिमित्त देशातील कोणत्याही प्रसिद्ध धार्मिक स्थळाला भेट द्यायची असेल तर तुम्ही वाराणसीला जाऊ शकता. गंगा नदीच्या काठावर वसलेले वाराणसी हे काशी विश्वनाथ मंदिरासाठी जगभर प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या निमित्ताने काशी विश्वनाथ मंदिरापासून गंगा नदीच्या काठापर्यंत हजारो दिवे प्रज्वलित केले जातात, तेव्हा दिवाळीचे सौंदर्य पाहण्यासारखे असते. दिवाळीनिमित्त या परदेशी पर्यटकांचेही आगमन होते.


 


जयपूर - दिव्यांच्या सजावटीचा नजारा पाहण्यासारखा


जर तुम्हाला शाही पद्धतीने दिवाळी साजरी करायची असेल तर तुम्ही राजस्थानमधील जयपूरला पोहोचले पाहिजे. सिटी पॅलेस ते आमेर किल्ला आणि हवा महल ते जंतरमंतर या शहरात सध्या दिव्यांची सजावट केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर जयपूरच्या जलमहालात दिवे आले की, नुसतं नजारा पाहिल्यासारखं वाटतं. दिवाळी साजरी करण्यासाठी केवळ स्थानिकच नाही तर परदेशी पर्यटकही जयपूरमध्ये येतात.


 


मसुरी - रोषणाईने सजवण्यात आलेले निसर्गरम्य ठिकाण


तुम्हाला उत्तराखंडच्या सुंदर ठिकाणी दिवाळी साजरी करायची असेल तर तुम्ही मसुरीला पोहोचले पाहिजे. डोंगराची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरीला दिवाळी साजरी करण्यासाठी हजारो लोक पोहोचतात. दिवाळीनिमित्त मसुरीचा मॉल रोड ते गांधी चौक हा रस्ता रोषणाईने सजवण्यात आला आहे. संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी अनेकजण गांधी चौकात पोहोचतात.



या ठिकाणीही फिरू शकता!


दिवाळीच्या खास प्रसंगी तुम्ही देशातील इतर अनेक ठिकाणी पोहोचू शकता. यासाठी तुम्ही राजस्थानमधील उदयपूर, हिमाचलमधील शिमला, महाराष्ट्रातील मुंबई, उत्तर प्रदेशातील आग्रा, गोवा अशी डेस्टिनेशन बनवू शकता.


 


 


हेही वाचा>>>


Winter Travel : हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत स्वर्गसुख अनुभवायचंय? भारतीय रेल्वेचे नोव्हेंबर-डिसेंबर टूर पॅकेज जारी, कमी बजेटमध्ये अशी करा बुकींग


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )