How To Control Cravings In Periods: मासिक पाळी (Periods) येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीत स्त्रियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ब्लोटिंग, पिरियड क्रॅम्प्स, मूड स्विंग्स यांसारख्या अनेक समस्या मासिक पाळीत उद्भवतात. या सर्व समस्यांपैकी एक सर्वसाधारण समस्या जी सर्वच स्त्रियांमध्ये उद्भवते ती म्हणजे, मासिक पाळीत सारखं गोड खावंसं (Control Cravings In Periods) वाटणं. 


मासिक पाळीत सारखं गोड खाण्याची क्रेविंग (Cravings) होणं, ही जवळपास सर्वच स्त्रियांमध्ये उद्भवणारी समस्या आहे. अर्थाच यामध्ये चिंतेचा काहीच कारण नाही. कारण मासिक पाळीत सारखं गोड खाण्याची क्रेविंग होण्यामागे काही हार्मोनल बदल आणि काही मानसिक कारणं असू शकतात. अनेकदा गोड खाण्याची क्रेविंग होण्यामागे हार्मोनल बदलच असतात. याचं कारण म्हणजे, या काळात शरीरात कमी होणारी कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स सतत गोड खाण्याचं क्रेविंग होण्यासाठी कारणीभूत ठरतात. चॉकलेट किंवा इतर कोणतेही गोड पदार्थ खाल्ल्यानं तुमची क्रेविंग पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. पण जर सतत तुम्हाला गोड खाण्याची क्रेविंग होत असेल, तर त्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काही उपया तुम्ही नक्की फॉलो करू शकता.  




पीरियड्स दरम्यान शुगर क्रेविंग कंट्रोल कसं कराल? (How to Control Sugar Cravings in Periods?)


मन शांत असणं गरजेचं 


मासिक पाळी दरम्यान तुमचं मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी तुमच्या घरातील वातावरण आनंददायी असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही घरबसल्या कॉमेडी चित्रपटही पाहू शकता. तुमचं मन आनंदी असेल, तर दुसरी कोणतीही इच्छा तुम्हाला फार त्रास देणार नाही. तसेच, क्रेविंगही होणार नाही. 


आहारात प्रोटिन्सचा समावेश करा 


शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, तुम्ही तुमची भूक शांत ठेवणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुमच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवा, याच्या मदतीनं तुम्ही तुमची गोड खाण्याची इच्छा नियंत्रणात ठेवू शकता. आहारात प्रोटिन्सचा समावेश केल्यानं तुम्हाला उर्जा मिळण्यासही मदत मिळते. 




जंक फूड खाणं टाळा 


पीरियड्स दरम्यान तुमचा आहार खूप विचारपूर्वक निवडा. यासाठी तुम्ही जंक फूडचं सेवन कटाक्षानं टाळावं, त्याऐवजी तुम्ही कडधान्य, ड्रायफ्रुट्स यांसारखे पौष्टिक पर्याय निवडू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही या काळात दही आणि चीजचं भरपूर सेवन करू शकता. यामुळे तुम्ही तुम्हाला सातत्यानं होणाऱ्या गोड खाण्याच्या क्रेविंगवर नियंत्रण मिळवू शकता. 


कॅल्शियमचा समावेश करा 


या काळात तुमच्या आहारात कॅल्शियम असणं अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियम आपल्या शरीरातील सेरोटोनिन हार्मोनची पातळी नियंत्रित करते. हा हार्मोन आपल्या मूड स्विंगसाठी जबाबदार असतो. कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी दररोज 1 ग्लास दूध प्या.


सतत गोड खाण्याची क्रेविंग का होते? (Why Do We Have Cravings For Sweets?)


पीरियड्स दरम्यान मूड स्विंग झाल्यामुळे आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. यापैकी एक म्हणजे, सतत गोड खाण्याची क्रेविंग होणं. या काळात आपल्या शरीरात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट दोन्ही कमी होऊ लागतात, ज्यामुळे आपल्या शरीराला गोड खाण्याची गरज वाढते. पण जास्त गोड खाल्ल्यानं तुमचं वजन वाढतं आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढू शकते. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी वर सांगितलेल्या उपायांचा अवलंब करू शकता. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मासिक पाळीतील भयंकर वेदना; पोटदुखी, अंगदुखीसह सर्व त्रासापासून काही सेकंदात होईल सुटका