Periods Pain: महिलांना मासिक पाळी (Period) येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. दर महिन्याला मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना त्रास सहन करावा लागतो. मासिक पाळी दरम्यान तीव्र पोटदुखी (Abdominal Pain), पोटात जळजळ होणं (Stomach Burning), पाय दुखणं (Leg Pain), ओटीपोटात दुखणं (Abdominal Pain) यांसारख्या समस्या उद्भवतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. पण त्याऐवजी काही घरगुती उपाय यावर गुणकारी ठरतात. अशा परिस्थितीत, मासिक पाळीतील वेदना किंवा क्रॅम्प्सपासून आपण आराम कसा मिळवू शकतो, ते सविस्तर जाणून घेऊयात... 


मासिक पाळी दरम्यान वेदना कशामुळे होतात?


1. प्रायमरी डिस्मेनोरिया (Primary Dysmenorrhea)


मासिक पाळी दरम्यान, महिलांचं शरीर हार्मोन्स रिलीज करतं, ज्यामुळे गर्भाशयात आकुंचन (Contraction) निर्माण होतं, ज्यामुळे गर्भाशयाचं अस्तर बाहेर येण्यास मदत होते. सामान्य पोटदुखी व्यतिरिक्त, हे आकुंचन अनेकदा पाय दुखणं आणि पाठदुखीच्या स्वरूपात जाणवतं. परंतु हे वयानुसार कमी होते आणि मासिक पाळी सुरू झाल्यानंतर एक किंवा दोन दिवस टिकते.


2. सेकेंडरी डिस्मेनोरिया (Secondary Dysmenorrhea)


हे फार सामान्य नाही, म्हणजेच हे फार कमी महिलांमध्ये आढळतं, जे अंडरलायनिंग डिसऑर्डर्समुळे किंवा कधीकधी संसर्गामुळे होतं. यामध्ये, वेदना केवळ मासिक पाळीच्या सुरुवातीपर्यंत टिकत नाही, तर संपूर्ण मासिक पाळीदरम्यान सुरू राहतं. यामध्ये जास्त रक्तस्त्राव होतो आणि कालावधी जास्त काळ चालू राहतो. 




मासिक पाळीतील वेदना दूर करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies to Relieve Menstrual Pain)



  • आराम करा, शांत आणि पूर्ण झोप घ्या. एका बादलीत एसेंशियल ऑईल टाकून त्यात पाय बुडवून शेक द्या, त्यामुळे काहीसा आराम मिळेल. 

  • मासिक पाळीतील वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पेन रिलीफ पॅड किंवा गरम पाण्याच्या पिशवीच्या मदतीनं पोट आणि कंबरेला शेक द्या. 

  • तुमचं पोट आणि पाठीच्या खालच्या भागाला हलक्या हातानं मालिश करा, वेदनेपासून सुटका मिळेल. 

  • हलक्या हातानं व्यायाम केल्यानं पेल्विक एरियामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि वेदनांपासून आराम मिळतो. 

  • मेडिटेशन करा आणि दीर्घ श्वास घ्या. 

  • जर तुम्हाला पीरियडमध्येही आराम करण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


मासिक पाळीत काय करावं आणि काय करू नये? (What To Do and What Not To Do During Menstruation?)



  • कमीत कमी कॅफेनचं सेवन करा. 

  • मद्यपान आणि धुम्रपान करणं टाळा. 

  • व्यायाम केल्यानं पीरियड्समध्ये आराम मिळतो आणि वजनही वाढत नाही. तसेच, यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या कमी होती. 

  • खाण्या-पिण्यात अशा पदार्थांचा समावेश करा, ज्यामध्ये फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतं. मासिक पाळीत हिरव्या पालेभाज्या, फळं आणि सलाडचा आहारात समावेश करा. 

  • साखरेचं प्रमाण अधिक असणारे पदार्थ खाणं टाळा. 

  • ताज्या फळांचे रस प्या. 


डॉक्टरांचा सल्ला कधी घ्याल? (When To Consult Doctor?)



  • कोणताही घरगुती उपाय फायदेशीर ठरत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या 

  • पेन किलरनंही आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांकडे जाच 

  • जर तुमच्या मासिक पाळीत सतत दोन-तीन महिने जास्त रक्तस्राव होत असेल आणि क्रॅम्प कमी होत नाहीत.

  • तुमची मासिक पाळी नसतानाही तुम्हाला क्रॅम्प येत असतील तर.

  • जेव्हा तुमच्या शरीराच्या इतर भागात जसं की, कंबर, मांड्या, गुडघे आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होत असतील तर. 

  • तुम्हाला क्रॅम्पसोबत ताप देखील आला असेल तर


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Definition of Childhood Cancer: बाल कर्करोगाचे प्रकार माहितयत? याबाबत अनेक चर्चा, गैरसमज दूर करण्यासाठी 'हे' नक्की वाचा