Hair Care Tips : चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच (Beauty Tips) केसांचं सौंदर्यही (Hair Care Tips) तेवढंच महत्त्वाचं असतं. केसांची काळजी घेणं, त्यांची निगा राखण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सपासून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमधून सांगण्यात येणारे अनेक उपाय आपण ट्राय करतो. अनेकदा मोठ मोठ्या आणि खर्चिक ट्रिटमेंट्सही घेतल्या जातात. पण अशा केमिकलयुक्त उपयांऐवजी तुमच्या स्वयंपाक घरात आढळणाऱ्या काही वस्तूंचा वापर करुन तुम्ही केसांसाठी उत्तम हेअर मास्क तयार करु शकता. 


तुमच्या स्वयंपाक घरात आढळणाऱ्या पदार्थांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. या पदार्थांचा वापर करुन तुम्ही केसांसाठी पोषक असा हेअर मास्क तयार करु शकता. तुम्हाला यासाठी फारशी शोधाशोधही करायची गरज भासणार नाही. तुमच्या स्वयंपाक घरात हमखास असणारी आणि रोजच्या जेवणात समाविष्ठ असणारी एक गोष्ट आहे, जी केसांसाठी गुणकारी ठरते. ती गोष्ट म्हणजे, कांदा. कांद्यासोबत तुम्ही इतर काही पदार्थ एकत्र करुन केसांसाठी उत्तम हेअर मास्क तयार करू शकता. 




कांद्याच्या रसाचा हेअर मास्क (Onion Hair Mask)


एक मीडियम कांदा घेऊन त्याचा रस काढा. त्यानंतर केसांच्या मुळांना हाताच्या बोटांनी लावून हलक्या हातानं मसाज करा. 15 ते 20 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर थंड पाण्यानं केस धुवून टाका. 


कांद्याचा रस आणि अंड्याचा हेअर मास्क (Onion And Egg Hair Mask)


एका बाऊलमध्ये एक अंड फोडून घ्या, त्यामध्ये दोन चमचे कांद्याचा रस एकत्र करा. स्कॅल्पला हळहळू मिश्रण लावून हलक्या हातानं मसाज करा. साधारणतः 30 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर थंड पाण्यानं केस धुवून टाका. तुम्ही रोज वापरणारा शॅम्पू तुम्ही वापरू शकता. 


कांदा आणि लिंबाचा रस (Onion And Lemon Juice)


दोन मोठे चमचे कांद्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा. मिश्रण हाताच्या बोटांच्या सहाय्यानं केसांच्या मुळांना लावून मसाज करा. 15 ते 20 मिनिटांसाठी तसंच ठेवा आणि थंड पाण्यानं केस धुवून टाका. 




कांद्याचा रस आणि कोरफडीचा गर (Onion And Aloe Vera Gel)


दोन चमचे कांद्याच्या रसात एक चमचा कोरफडीचा गर एकत्र करा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर केसांच्या मुळांना मसाज करा आणि अर्धा मिनिटांसाठी तसंच ठेवून थंड पाण्यानं केस व्यवस्थित धुवून घ्या. 


कांदा आणि ऑलिव्ह ऑईल हेअर मास्क (Onion And Olive Oil Hair Mask)


दोन चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा कांद्याचा रस एकत्र करा. तयार झालेल्या मिश्रणानं केसांच्या मुळांना मसाज करा. 20 ते 30 मिनिटांसाठी ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्यानं केस धुवून टाका 


कांदा आणि दह्याचा हेअर मास्क (Onion And Curd Hair Mask)


दोन मोठे चमचे कांद्याचा रस आणि दोन मोठे चमचे दही एकत्र करा आणि तयार हेअर मास्क केसांना लावा. केसांच्या मुळांना मसाज करा. साधरण 30 मिनिटांसाठी तसंच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्यानं केस धुवून टाका. 


कांद्याचा रस आणि खोबऱ्याचं तेल (Onion And Coconut Oil)


दोन मोठे चमचे कांद्याच्या रसात दोन मोठे चमचे खोबऱ्याचं तेल एकत्र करुन हेअर मास्क तयार करून घ्या. त्यानंतर केसांच्या मुळांना लावून मसाज करा. कमीत कमी 60 मिनिटांसाठी ठेवा आणि त्यानंतर केस थंड पाण्यानं केस धुवून घ्या. 


कांद्याचा रस आणि मध (Onion And Honey)


दोन मोठे चमचे कांद्याचा रस आणि मध एकत्र करा, त्यानंतर मिश्रण केसांच्या मुळांना लावून हलक्या हातानं मालिश करा. साधारण 30 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर थंड पाण्यानं धुवून टाका. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Does Collagen Prevent Ageing Signs : तुमच्या त्वचेचं म्हातारपण रोखण्याचं काम खरंच 'कोलेजन' करतं? तज्ज्ञ सांगतात...