एक्स्प्लोर

Health Tips : सणासुदीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना या सात गोष्टी लक्षात ठेवा!

Health Tips : सणासुदीत वेगवेगळ्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे ओघाने आलेच, साहजिकच आहारात कॅलरीज, फॅट आणि शर्करा यांचे प्रमाण वाढते, त्याबरोबरीनेच या सर्व पक्वानांमध्ये मीठ देखील जास्त प्रमाणात असते.

Health Tips In Marathi  : सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे ओघाने आलेच, साहजिकच आहारात कॅलरीज, फॅट आणि शर्करा यांचे प्रमाण वाढते, त्याबरोबरीनेच या सर्व पक्वानांमध्ये मीठ (सोडियम) देखील जास्त प्रमाणात असते. सणासुदींकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनामध्ये थोडा बदल करणे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. खरे पाहता, हीच ती वेळ असते जेव्हा आपण आपल्या आहाराकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि खूप जास्त गोड आणि जंक फूड यामुळे शरीराचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवले पाहिजे. सणासुदीच्या काळात एकामागोमाग एक, भरपूर पदार्थ खाणे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे, आपल्या आरोग्याचा समतोल ढळू नये यासाठी हे खूप गरजेचे आहे टाटा सॉल्ट सुपरलाईट येथील प्रसिद्ध पोषण सल्लागार कविता देवगण यांनी यासाठी महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत..  

यंदा सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना सात अतिशय सोप्या गोष्टी नक्की ध्यानात ठेवा :

1. सणासुदीचा आनंद घ्यायचा पण आरोग्याला काहीही नुकसान पोहोचू द्यायचे नसेल तर प्रमुख मंत्र आहे संयम. तळलेल्या फरसाणाची बशी तुमच्यासमोर ठेवली जाते तेव्हा ते सगळे फस्त करण्याऐवजी एखादा चमचाभर खा. सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला अनेक वेगवेगळे आवडीचे पदार्थ असताना, कोणताही खाद्यपदार्थ आपण किती खातो यावर नियंत्रण ठेवणे ही बाब खूप आवश्यक आहे.

2. दिवसातून किमान एकदा सात्विक जेवण जेवा. त्यामुळे इतर जेवणे आणि अनावश्यक स्नॅक्स यामुळे शरीरात वाढलेल्या कॅलरीजचे संतुलन करता येते. वजन योग्य प्रमाणात राहावे यासाठी हे गरजेचे आहे. सात्विक अन्न म्हणजे फक्त फळे, कोशिंबिरी आणि भाज्या खा.

3. सणासुदीच्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते त्यावर नियमितपणे नियंत्रण ठेवून हायपरटेन्शनची जोखीम जाणीवपूर्वक टाळा. विश्वसनीय ब्रँडचे कमी सोडियम असलेले मीठ वापरू शकता, या मिठामध्ये रिफाईंड आयोडाइज्ड मिठापेक्षा 15% ते 30% कमी सोडियम असतो.

4.  सण म्हणजे कार्बोहायड्रेट्स असलेले खाद्यपदार्थ एकामागोमाग एक खाल्ले जाणे. तुमच्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा जाणीवपूर्वक वापर करा. प्रत्येक आहारामध्ये किंवा स्नॅक्समध्ये प्रथिने व त्यासोबत कॉम्प्लेक् कार्बोहायड्रेट्स असे मिश्रण असलेले पर्याय निवडा.

5. सणासुदीचे जड जेवण आम्लयुक्त असण्याची दाट शक्यता असते, यामुळे आपल्या आतड्यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे आहारामध्ये अल्कलाईन खाद्यपदार्थांचा जाणीवपूर्वक समावेश करून पोटाचा पीएच योग्य राखा. यामध्ये लिंबू खूप उपयुक्त ठरू शकतात. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा, त्यामुळे देखील पोट अल्कलाईन होते.

6. आहारामध्ये साखरेचा अति वापर हा नेहमीच घातक असतो. त्यावर मात करण्यासाठी दररोज थोडी दालचिनी खा. या मसाल्यामध्ये हायड्रोक्सिचालकोन असते जे फास्टिंग ग्लुकोज नियंत्रणात राखण्यास मदत करते.

7. नियमितपणे, भरपूर पाणी प्या. दररोज कमीत कमी सात ते दहा ग्लास भरून पाणी प्यायले गेले पाहिजे. यामुळे शरीरातील विषद्रव्ये सौम्य होतात आणि (जंक फूड खाता त्यामधून शरीरात शिरलेला) तुमच्या शरीरातून सहजपणे बाहेर निघून जातात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
सावधान! सणासुदीच्या काळात डोळ्यांचा मेकअप करताय? तर घ्या काळजी, संवेदनशील डोळ्यांसाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Health Tips : लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
लहान वयात वाढतेय लठ्ठपणाची समस्या; वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत 300 बालरुग्णांची नोंद
Women Health: महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...
महिलांमध्ये संधिवाताचा धोका वाढतोय? हार्मोन्समधील बदलांचा सांध्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
Embed widget