उन्हाळा येतोय...रोज प्या नारळपाणी! हृदय, ब्लड प्रेशर आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर
उन्हाळ्याच्या दिवसात रोज नारळपाणी पिल्याने अनेक फायदे मिळतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तर इतरही त्याचे अनेक फायदे आहेत.
मुंबई: नारळपाणी पिण्याचे आपल्या आरोग्यासाठी अन्यसाधारण फायदे आहेत. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता भासते तेव्हा नारळपाणी हा रामबाण उपाय आहे. एवढेच नव्हे तर रोज नारळपाणी पिल्याने हृदय आणि ब्लड प्रेशर दोन्ही नॉर्मल राहते. नारळ पाणी पिल्याने आपली शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि लिव्हर स्वस्थ राहते. नारळ पाणी आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरतं.
नारळपाण्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेन्ट गुण असतात. दररोज नारळ पाणी पिल्याने शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर निघतात. नारळ पाणी पिण्याचे सविस्तर फायदे पुढीलप्रमाणे,
1. ब्लड प्रेशर कंट्रोल- नारळपाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे आपले ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास मदत होते. दिवसातून एक किंवा दोनवेळा नारळ पाणी पिणे आवश्यक असते.
2. हृदय विकार मुक्त - नारळपाणी पिल्याने शरीरातील कोलेस्टोरॉल आणि ट्राय-ग्लिसराइड कमी होण्यात मदत होते. त्यामुले हर्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
3. वजन कमी होतं - नारळ पाण्यामध्ये ज्युसच्या प्रमाणामध्ये साखरेचे प्रमाण आणि कॅर्बोहायड्रेड कमी असते. यामुळे वजन कमी होण्यात मोठी मदत होते. इतर पेयांच्या तुलनेत नारळ पाण्यामध्ये कमी कॅलरी असतात, त्यामुळे त्याचा फायदा हा आपलं वजन नियंत्रित राहण्यासाठी होऊ शकतो.
4. रोगप्रतिकारक शक्ती वाढविते- नारळपाणी पिल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. एका नारळामध्ये 600 मिलिग्रॅम पोटॅशियम असते तज्ज्ञांच्या मते, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना नारळपाणी दिल्यास खूप फायदे होतात .
5- पचन क्षमता व्यवस्थित राहते- कोरोनाच्या नव्याने आलेले लक्षण म्हणजेच डायरिया आणि अतिसारच्या समस्यावर नारळपाणी लाभदायक ठरते. तसेच उलटी, पोटात जळजळणे, सूज आणि अल्सर या सर्व समस्यांचे निवारण नारळपाण्यामुळे होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
- Health Tips : फ्रीजमधील पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक; किती थंड पाणी पिणे योग्य? जाणून घ्या
- Health Tips : कच्चे आले आहे आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या याचे फायदे
- Health Tips : रोज ओट्स खाल्ल्याने आरोग्याला मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे, वजनही होईल कमी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )