Harmful Food For Health : आजकाल आपण पाहतोयत उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा आजार या व्याधींनी लोक त्रस्त आहेत. विशेषत: तरूणांमध्ये हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे. यामागे बदलती जीवनशैली हे एक कारण आहे. हृदयरोगींना कधीकधी वेगवान किंवा मंद हृदयाच्या ठोक्याची समस्या जाणवते. याशिवाय उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या देखील जाणवते. अशा वेळी आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारातून काही पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. जर तुम्ही या गोष्टींचे सेवन मर्यादित केले नाही तर हृदयाचे आजार तुमच्यापासून दूर राहू शकणार नाहीत. यामुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, कार्डियाक अरेस्ट आणि स्ट्रोक यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. निरोगी हृदयासाठी, आपण आहारातून सफेद पदार्थ काढून टाकले पाहिजेत. हे पदार्थ कोणते ते वाचा. 


मीठ - मीठ हा जेवणातला अविभाज्य घटक. मीठाशिवाय अन्नाला चव लागत नाही. पण, हृदयरोग्यांसाठी मीठ विषापेक्षा कमी नाही. हृदय आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मीठ मर्यादित प्रमाणात खावे. जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला अनेक नुकसान होऊ शकतात. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब होतो आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो.


गोड टाळा - जास्त साखर खाल्ल्यास शरीरातील इन्सुलिन वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे हृदयरोग्यांनी जास्त गोड खाऊ नये. जास्त साखर खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. 


मैदा - हृदयरोग्यांसाठी मैदा अत्यंत घातक आहे. मोठ्या प्रमाणात मैदा खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते. कॉलेस्ट्रॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. जो शरीराच्या कोणत्याही भागामध्ये रक्त वाहून नेण्याच्या मार्गात जमा होतो. मैदा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.


अंड्यातील पांढरा बलक - अंड्यातील पांढरा बलकमध्ये सॅच्युरेटेड फॅट असते. अशा वेळी हृदयरोग्यांनी अचानक अंडी खाणे बंद करू नये तर हळूहळू हा बदल करावा. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी आणि ए मुबलक प्रमाणात आढळते. हृदयरोगींनी अंडी कमी प्रमाणातच खावीत. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :