Chest Pain Recognization : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कारणांमुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अचानक सांधे दुखू लागतात, मानेचा त्रास, कंबर दुखी अशा अनेक व्याधींनी आपण त्रस्त असतो. त्यातलीच एक समस्या म्हणजे  छातीत दुखू लागणे. छातीत दुखण्याचे नेमके कारण काय हे आपल्याला माहितही नसते. आणि म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, हेच दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. चला तर जाणून घेऊयात छातीत दुखण्याची समस्या कशामुळे होते हे जाणून घेऊयात.


1. जेवणानंतर छातीत दुखणे   


तुम्हाला छातीत जळजळ होण्याचा त्रास होतोय आणि हे दुखणे पाठीपर्यंत वाढत आहे. अशा वेदना साहसा अन्न खाल्ल्यानंतर होतात. जर तुम्हाला या लक्षणांसह जेवणानंतर छातीत दुखत असेल, तर तुम्हाला समजले पाहिजे की तुमच्या छातीत जळजळ होत आहे आणि अन्ननलिकेमध्ये या जळजळीमुळे तुम्हाला छातीत दुखण्याचा आणि जळजळीचा त्रास होत आहे.   


2. श्वास घेताना वेदना जाणवतात


काहींना श्वास घेताना अचानक छातीत दुखू लागते. अशा वेळी तुम्ही थेट तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. जर छातीत घट्टपणा आणि  श्वास घेण्यास त्रास होत असेल तर सर्वात आधी तुम्हाला तणाव जाणवतोय का त्याकडे लक्ष द्या. तसेच हा तणाव नेमका कशामुळे होतोय ते शोधा. आराम करा आणि शांत, सुंदर ठिकाणी फिरा.


3. छातीत दुखणे 


छातीत दुखण्याबरोबरच तीक्ष्ण टोचण्याची कळ जाणवत असेल तर ही समस्या तुमच्या स्नायूंना होणारी चिडचिड असू शकते. याला Tietze सिंड्रोम असेही म्हणतात. या स्थितीत, तुमच्या फासळ्या आणि कूर्चामध्ये वेदना होतात, परंतु ही स्थिती फारशी प्राणघातक नसते आणि काही काळानंतर ती स्वतःहून बरी होते. हे सहसा एका ठिकाणी चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे किंवा लांब बसून काम केल्यामुळे होते. काही वेळाने दुखणे बरे झाले नाही तर डॉक्टरांना भेटा.


4. फुफ्फुसामुळे होणारी वेदना


जर तुम्हाला दीर्घ घेताना त्रास होत आहे. तुमच्या छातीत दुखत आहे. ही समस्या सहसा फुफ्फुसात होत असते आणि त्यामुळे तुम्हाला छातीत दुखते. या परिस्थितीत, डॉक्टरांना भेटणे चांगले.


5. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारा त्रास 


जर तुम्हाला छातीत तीव्र वेदना होत असतील आणि विश्रांती घेऊनही तुम्हाला आराम मिळत नसेल, तर हे दुखणे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देखील असू शकते. ही वेदना सहसा जास्त खाल्ल्यानंतर, तणावामुळे किंवा अतिव्यायाम केल्यानंतर अनुभवता येते. त्यामुळे या दुखण्यापासून त्वरित आराम मिळण्यासाठी तुम्ही झोपा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. जर आराम मिळत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :