Urine Problems : शरीराच्या 'या' भागांमध्ये होत आहेत वेदना? मग सावधान... यूरिक अॅसिडच्या प्रमाणात होतेय वाढ
Uric Acid Symptoms : युरिक अॅसिड वाढणे ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. पण ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात.
![Urine Problems : शरीराच्या 'या' भागांमध्ये होत आहेत वेदना? मग सावधान... यूरिक अॅसिडच्या प्रमाणात होतेय वाढ health tips unbearable pain in these parts of body sigh of uric-acid-level-increases Urine Problems : शरीराच्या 'या' भागांमध्ये होत आहेत वेदना? मग सावधान... यूरिक अॅसिडच्या प्रमाणात होतेय वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/aa38e341eb955f8479954bb2a21e151a1675766276794358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
युरिक अॅसिडची समस्या कधी होते?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, युरिक अॅसिड वाढल्याने शरीराच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. पूर्वी ही समस्या केवळ वृद्धांमध्येच दिसून येत होती. मात्र, आता तरुणही याला बळी पडत आहेत. जेव्हा आपण प्युरीनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खातो तेव्हा रक्तातील यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. आपली किडनी युरिक अॅसिड फिल्टर करते आणि लघवीद्वारे शरीराबाहेर काढते. पण, जेव्हा प्युरीनचे प्रमाण वाढते तेव्हा किडनी नीट कार्य करू शकत नाही आणि युरिक अॅसिड रक्तात मिसळू लागते.
आरोग्यावर यूरिक अॅसिडचे परिणाम
रक्तामध्ये असलेले युरिक अॅसिड सांध्याभोवती जमा होते, ज्यामुळे तीव्र वेदना होतात. युरिक अॅसिड वाढल्याने पचनक्रियाही बिघडते. यूरिक अॅसिड हे आरोग्यासाठी अत्यंत घातक मानले जाते. हे वेळीच ओळखले नाही तर ही गंभीर समस्या होऊ शकते. यामुळे शरीराचे असे अनेक भाग आहेत, जिथे वेदना सुरू होतात.
'या' अवयवांमध्ये वेदना म्हणजे यूरिक अॅसिड वाढल्याची लक्षणं
पायाच्या अंगठ्यात सूज येणे
जर तुमच्या पायाच्या अंगठ्यात सूज किंवा वेदना जाणवत असतील तर समजून घ्या की यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढले आहे.
गुडघेदुखी
संधिरोगाच्या समस्येमध्ये गुडघ्यांचा सर्वाधिक त्रास होतो. जेव्हा युरिक अॅसिडची पातळी वाढते तेव्हा पहिली लक्षणे गुडघ्यावरच दिसतात. गुडघ्यात तीव्र वेदना होत असल्यास आणि पायऱ्या चढण्यास त्रास होत असल्यास प्युरीनयुक्त पदार्थ खाणे बंद करा.
कंबर आणि मानेत तीव्र वेदना
कमी वयात कंबर आणि मानेमध्ये तीव्र वेदना होत असतील तर ते युरिक अॅसिड वाढल्याचे लक्षण असू शकते. युरिक अॅसिड वाढल्यामुळे शरीराच्या अवयवांमध्ये ताण सुरू होतो आणि तीव्र वेदना जाणवतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)