Health Tips : हिवाळ्यात (Winter) गुलाबी थंडीत उन्हात बसण्याचा स्वतःचा आनंद वेगळाच असतो. मात्र सुर्यप्रकाश तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीरासाठी अन्न आणि पेय आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सूर्यप्रकाश घेण्याचे फायदे सांगत आहोत. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.


रोगप्रतिकारशक्ती वाढवते - सूर्यप्रकाशामुळे प्रतिकारशक्ती आणि चयापचय सुधारते. तुमचे अनेक आजारांपासून संरक्षण होते. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा सकाळी किंवा सुमारे 20-30 मिनिटे उन्हात बसा. सूर्यप्रकाशात बसणे मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. काविळसारखा गंभीर आजार बरा करण्याची क्षमता सूर्यकिरणांमध्ये असते.


त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी - सूर्यप्रकाशात असे अनेक चमत्कारी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरावर विविध प्रकारच्या त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी होतो.


मुलांसाठी फायदेशीर - सूर्यप्रकाशात बसल्याने मुलांना खूप फायदा होतो. ज्या मुलांनी आईचे दूध पिणे बंद केले आहे त्यांच्यासाठी सूर्यप्रकाश खूप फायदेशीर आहे. मुलांच्या विकासासाठी हे चांगले आहे.


कर्करोगाचा धोका कमी - अनेक प्रकारच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, जे लोक उन्हात कमी बाहेर जातात, त्यांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.


शरीराची हाडे मजबूत होतात - सूर्यामध्ये व्हिटॅमिन-डी असते, ज्यामुळे आपल्या शरीराची हाडे मजबूत होतात. यामुळे सांधेदुखीची समस्या कमी होते.


चांगल्या झोपेसाठी उपयुक्त - सूर्यप्रकाश घेतल्याने आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन तयार होतो. ज्यामुळे चांगली आणि शांत झोप लागते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha