Omicron in Kids : ओमायक्रॉन (Omicron) प्रकारामुळे भारतासह जगभरात हाहाकार माजला आहे. लहान मुलांना ओमायक्रॉनचा फारसा धोका नाही असे सुरुवातीला बोलले जात होते, परंतु आता मुलांवरही याचा गंभीर परिणाम होत आहे. मुलांची रुग्णालयात भरती होण्याची प्रकरणे वाढत आहेत. विशेषत: मुले जी आधीच अनेक आजारांना बळी पडलेली आहेत त्यांना अधिक धोका आहे. गेल्या आठवड्यापासून भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असले तरी ओमायक्रॉन प्रकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत, ओमायक्रॉन लागण झालेल्या मुलामध्ये सामान्यतः दिसणारी लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुलांना वेळेत उपचार मिळू शकतील.


संक्रमित मुलामध्ये 'ही' लक्षणे 
झो (Zoe) कोविड लक्षण अभ्यासानुसार, थकवा हे मुलांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. यानंतर, डोकेदुखी, घसादुखी, नाक वाहणे आणि शिंका येणे यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात. झो कोविड स्टडी अ‍ॅपवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, लहान मुले आणि प्रौढांमध्ये ओमायक्रॉनची लक्षणे वेगळ्या पद्धतीने दिसतात.


फार कमी मुलांमध्ये आढळली 'ही' लक्षणे
याशिवाय जुलाब आणि शरीरावर पुरळ देखील येऊ शकते, परंतु ओमायक्रॉनची लागण झालेल्या फार कमी मुलांमध्ये ही लक्षणे दिसून आली आहेत. अभ्यासादरम्यान गोळा केलेल्या माहितीनुसार असेही दिसून आले आहे की, काही प्रकरणांमध्ये मुलांमध्ये क्रुप (Croup) होऊ शकतो, ही अशी स्थिती जेव्हा एखाद्या संक्रमित मुलाच्या घशातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतो. जरी लसीकरण असलेल्या मुलांमध्ये ओमायक्रॉनची लागण झाली असली तरी त्यांना फक्त सौम्य सर्दी होते.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha